MGNREGA : जळगाव जिल्ह्यात ‘मनरेगा’ कामांत गडबडीचा संशय

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात कामे सुरू आहेत. मात्र या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी यंत्रणांची आहे.
MGNREGA
MGNREGAAgrowon

जळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) जिल्ह्यात कामे सुरू आहेत. मात्र या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी यंत्रणांची आहे. ‘मनरेगा’अंतर्गत (MGNREGA Work) बहुतांश ठिकाणी खूप गडबडी असल्याचा संशय ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आढावा बैठकीत व्यक्त केला.

MGNREGA
देशातील ३ कोटी कुटुंबांकडून ‘मनरेगा’अंतर्गत कामांची मागणी

जिल्ह्यातील ‘मनरेगा’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात बैठक झाली. या वेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, रोहयो उपजिल्हाधिकारी प्रसाद मते उपस्थित होते. महाजन म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्ध भारताचे स्वप्न पाहिले आहे.

MGNREGA
Banana : केळीसाठी ‘मनरेगा’ची होणार अंमलबजावणी

ते पूर्ण करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. त्यासाठी ग्रामीण भागाचा सर्वंकष विकास साधावा लागेल. सध्याच्या काळात शहरे गजबजली आहेत, गावे मात्र ओस पडली आहेत. गावाकडे बघण्याची नकारात्मकता बदलायला हवी. शेवटच्या माणसाच्या जीवनमानात बदल घडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ‘मनरेगा’अंतर्गत सिंचन विहिरी, शेततळे, शोषखड्डे यांसारख्या योजना आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.’’

‘‘हागणदारीमुक्ती’ योजनेचा बोजवारा’

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’चा नारा दिला आहे. मात्र आजही खेड्यापाड्यांवर ‘हागणदारीमुक्ती’ योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे खुद्द मंत्री महाजन यांनी सांगितले. शौचालयासाठी अनुदान दिले गेले. मात्र या शौचालयांना स्टोअररूमचे स्वरूप आले आहे. आजही अनेक जण उघड्यावर प्रातर्विधीसाठी जातात. आता यापुढे अशा व्यक्तींना गुलाबाचा पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी केली जाईल,’’ असे महाजन म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com