Water Pollution : ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानाला नगरमध्ये प्रारंभ

जिल्ह्यात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान राबविले जाणार आहे.
Water Pollution
Water PollutionAgrowon

नगर ः जिल्ह्यात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ (Clean water Security) अभियान राबविले जाणार आहे. त्याच अनुषंगाने अभियानाला सुरुवात करत जिल्ह्यातील नळ पाणीपुरवठा योजनेच्या (Water Supply Scheme) अस्तित्वातील सर्व स्रोतांचे जिओ टॅगिंग, पाणी गुणवत्ता परीक्षण तसेच एफटीकेद्वारे तपासणीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कार्यशाळा झाली.

Water Pollution
Maisal Water Scheme : जत-म्हैसाळ विस्तारित योजना अहवाल पाठवण्याची सूचना

जलजीवन मिशनअंतर्गत केंद्र शासनाच्या जलजीवन सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगाने ‘स्वच्छ जल से सुरक्षा’अभियान राबविले जात आहे. गुरुवारी (ता. १) हे अभियान सुरू झाले असून, ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ते सुरू राहील. नगर जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरुवारी (ता. १) सकाळी अभियानाचा प्रारंभ करून कार्यशाळा घेण्यात आली. ग्रामीण भागात हे अभियान राबविले जाणार असून पाणी आणि आरोग्य याचा निकटचा संबंध आहे.

ग्रामीण भागातील लोकांना शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. रासायनिक पाणी तपासणीचे एकूण अकरा पॅरामीटरमध्ये सविस्तर प्रात्यक्षिक दिले. तसेच स्वयंसेवक एफ.टी.के. महिला जल सुरक्षक यांचे WQMIS संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी तसेच WQMIS संकेतस्थळावर पाणी नमुना तपासणीचे नोंदी करण्याबाबतचे प्रशिक्षणही दिले. कार्यशाळेत रासायनिक पाणी तपासणीचे अकरा पॅरामीटरमध्ये प्रात्यक्षिक दिले.

Water Pollution
Farmer Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी करा अर्ज

या अभियानांतर्गत हर घर जल या मोबाईल ॲपद्वारे अस्तित्वातील सर्व पाणीपुरवठा योजना, रेट्रो फिटिंगमधील पाणीपुरवठा योजना व नवीन योजनेतील स्रोतांची जिओ टॅगिंग पूर्ण करणे, सर्व स्रोतांची मॉन्सूनपश्‍चात कालावधीमधील रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच सर्व पाणी नमुने जल सुरक्षकामार्फत गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत हर घर जल या मोबाईल अॕपद्वारे जिल्ह्यातील अस्तित्वातील नळ पाणीपुरवठा योजना व दुरुस्ती करण्यात येणाऱ्या योजनेतील मुख्य स्रोत यांचे जिओ टॕगिंग करून प्रयोगशाळेत व गावातील ५ महिलांच्या माध्यमातून पाणी नमुन्यांची तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com