शेतकऱ्यांकडून होणारी दंड वसुली संशयाच्या भोवऱ्यात

येथील शेतकरी मंगेश जाधव या शेतकऱ्याने भाजीपाल्यासोबत कांदा नाशिक समितीच्या मुख्य आवारात विक्रीसाठी आणला होता. मात्र त्यामुळे बाजार समितीच्या कर्मचाऱ्याने जाधव यांच्याकडून दंड वसुल केला. हा प्रकार 'ॲग्रोवन'ने वृत्त प्रकाशित करून उजेडात आणला.
शेतकऱ्यांकडून होणारी दंड वसुली संशयाच्या भोवऱ्यात
APMCAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : शेणीत (ता.इगतपुरी) येथील शेतकरी मंगेश जाधव (Mangesh Jadhav) या शेतकऱ्याने भाजीपाल्यासोबत कांदा (Onion) नाशिक समितीच्या मुख्य आवारात विक्रीसाठी आणला होता. मात्र त्यामुळे बाजार समितीच्या कर्मचाऱ्याने जाधव यांच्याकडून दंड वसुल केला. हा प्रकार 'ॲग्रोवन'ने (Agrowon) वृत्त प्रकाशित करून उजेडात आणला. त्यानंतर गंगापाडळी (ता. नाशिक) येथील शेतकरी सुदाम वलवे यांनीही जागा फी पावती सादर करून दंड वसूल केल्याचे कळविले. त्यामुळे आशा पद्धतीने शेतकऱ्यांकडून होणारी दंडाची वसुली संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

या बाबत बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले की, भाजीपाला बाजारात कांदा आल्यानंतर कामकाजात गोंधळ होतो. कांदा व्यापाऱ्यांची या मुद्द्यावर ओरड होते. या बाबत सुरक्षा अधिकाऱ्याने तर शेतकरीच दादागिरी करत असल्याचे सांगत बोलणे टाळले. मात्र शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य बाजारात कांदा आणू नये, या साठी स्पष्ट फलक का लावले नाहीत? या बाबत आवारात वेळोवेळी उद्घोषणा का केली जात नाही, असे विचारले असता ते निरुत्तर झाले. अशी दंडवसुली कायदेशीर आहे का? असे विचारले असता त्यांनी अधिकचे बोलणे टाळले.

दंड म्हणून ‘जागा फी पावती’ देण्यात येते. त्यामध्ये ‘नाव’ व ‘राहणार’ हा रकाना असताना शेतकऱ्याच्या फक्त पहिल्या नावाचा उल्लेख व पत्ताही पूर्ण लिहिलेला नसतो. त्यामुळे बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांकडून दंड वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभय कुणाचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र आता बाजार समितीच्या नवनियुक्त प्रशासकांनी या प्रकरणाची माहिती मागविली आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर या बाबत माहिती घेऊन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश सचिवांना दिले आहेत. या बाबत सखोल माहिती घेऊन कार्यवाही करू. शेतकऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने वसुली करण्यात येत असेल तर संबंधितांवर कारवाई होईल हे नक्की. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही.
- फय्याज मुलाणी, प्रशासक, नाशिक बाजार समिती.

कांदा आणायचा नाही, असे सांगून थेट दंड वसूल केली जाते. दुय्यम प्रतवारीचा माल कांदा बाजारात घेतला जात नसल्याने भाजीपाला बाजारात आणतो. यापूर्वी माझ्या कांदा गोण्या जप्त करण्यात आल्या होत्या. याबाबत दंड केला म्हणजे शेतकरी या बाजारात कांदा आणणार नाहीत, असे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते.
- सुदाम वलवे, शेतकरी, गंगापाडळी, जि. नाशिक.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com