Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजनांची कामे दर्जेदार करावीत

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांचा गुरुवारी (ता.१७) आढावा घेतला. योजनेची कामे दर्जेदार, पारदर्शीपणे आणि गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.
Water Supply Scheme
Water Supply SchemeAgrowon

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या (Jal Jeevan Mission) कामांचा गुरुवारी (ता.१७) आढावा घेतला. योजनेची कामे दर्जेदार, पारदर्शीपणे आणि गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.

Water Supply Scheme
Water Conservation : राजापुरात लोकसहभागातून उभारले वनराई बंधारे

बैठकीला आमदार भीमराव तापकीर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, उप-कार्यकारी अभियंता अमित आडे आदी उपस्थित होते.

Water Supply Scheme
Rural Water Supply : रोजंदारी पाणीपुरवठा कमर्चाऱ्यांना अधिसंख्य पदांवर सामावून घेणार

पाटील म्हणाले, ‘‘२०२४ पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरी नळाचे पाणी असेल, यासाठी नियोजनबद्ध काम करावे. आता जिल्हा दर सूचीच्या (डीएसआर) दरात वाढ झालेली असल्यामुळे त्यानुसार योजनांसाठी निविदा जाहीर केलेल्या असल्यास निविदेच्या रकमेपेक्षा अधिक दराने निविदा नसाव्यात.

अस्तित्वातील योजना निकषानुसार पाणी पुरविण्यासाठी पुरेशा नाहीत, तेथे आवश्यक ती तपासणी करून नवीन योजना करण्याऐवजी सध्याच्या अस्तित्वातील योजनांची क्षमतावाढ करण्यावर भर द्यावा. सुरू असलेले काम आराखड्यानुसार आणि निकषानुसार सुरू आहे का, याची बारकाईने तपासणी करावी. योजनांसाठी शासकीय जागा आवश्यक असल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरून आढावा घेऊन मार्ग काढावा.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com