...तर प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या चाळीस आमदारांसह भाजपला दिलेला पाठिंबा काढून घेतल्यास गुजरातला गेलेला दीड लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रात पुन्हा येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले.
Jayanrao Patil
Jayanrao PatilAgrowon

नवेखेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या चाळीस आमदारांसह भाजपला दिलेला पाठिंबा काढून घेतल्यास गुजरातला गेलेला दीड लाख कोटींचा प्रकल्प (Gujarat Project) महाराष्ट्रात पुन्हा येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील (Jayanrao Patil) यांनी केले.

Jayanrao Patil
Eknath Shinde : मराठवाड्यासाठी भरीव निधी देणार : मुख्यमंत्री शिंदे

बोरगाव ता. वाळवा येथील माजी सरपंच व सावकरदादा उद्योग संकुलाचे नेते स्व. अशोकराव धोंडिराम पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राजारामबापू सह. दूधसंघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, संचालक धैर्यशील पाटील, दिग्विजय पाटील, विष्णूपंत शिंदे, एस टी पाटील, प्रा.शामराव पाटील, शामराव वाटेगावकर, माणिकराव पाटील, विजय पाटील, कार्तिक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Jayanrao Patil
Cotton Seed Technology : दोन वर्षांत नवे कापूस बियाणे तंत्रज्ञान येणार

आमदार पाटील म्हणाले, कोरोनाने अनेक जिवाभावाची माणसे गेली याचे खूप दुःख वाटत आहे. स्व.अशोकराव पाटील अण्णा यांच्याकडे विधायक दृष्टी होती. अशोकराव अण्णांचे सुपुत्र धैर्यशील पाटील यांच्याकडे नेतृत्व, अभ्यास, तंत्रज्ञान इ. गुणांची चुणूक आहे. धैर्यशील पाटील म्हणाले, की स्व.अण्णांचे निधनाने खूप ही खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या स्मृतिनिमित्त अनेक सामाजिक व विधायक उपक्रम राबविले जात आहेत. त्यांच्या कामांचा वसा आणि वारसा आम्ही जोपासू.या प्रसंगी स्व.अशोकराव अण्णा यांच्या तैलचित्राचे अनावरण आ.जयंतराव पाटील यांच्याहस्ते झाले.

याप्रसंगी संजय पाटील, भगवानराव पाटील, प्रकाश पाटील, उदय शिंदे,विकास पाटील, संभाजी जाधव,अनिल पाटील,जे डी मोरे, सरपंच प्रदीप चव्हाण, उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com