Maha Awas Abhiyan : महाआवास’ अभियानाचे जिल्ह्यास तीन पुरस्कार

महाआवास अभियान ग्रामीण २०२०-२१’ मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांत जिल्ह्याला वेगवेगळे तीन पुरस्कार मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
Maha Awas Abhiyan
Maha Awas AbhiyanAgrowon

सोलापूर ः ‘महाआवास अभियान ग्रामीण २०२०-२१’ (Maha Awas Abhiyan Rural) मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांत जिल्ह्याला वेगवेगळे तीन पुरस्कार मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekunath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

Maha Awas Abhiyan
Modern Agriculture : शेतीमध्ये आधुनिकता रुजविणे गरजेचे

‘अमृत महाआवास अभियान’ २०२२-२३ मध्ये संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल. या अभियानाचा प्रारंभ मुंबईत करण्यात आला. या वेळी स्वामी यांचा सन्मान करण्यात आला. जिल्ह्यास विविध उपक्रमांसाठी तीन पुरस्कार प्राप्त झाले.

मुख्यतः घरकुले पूर्ण करणे, नावीन्यपूर्ण घरकुलांचे बांधकाम करीत असताना नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे (उदा. पर्यावरणपुरक साहित्याचा वापर करणे), सीएसआर निधी उपलब्ध करणे आदी कामी स्वामी व तत्कालीन प्रकल्प संचालक अर्जुन गुंडे व संतोष धोत्रे यांनी सातत्याने मार्गदर्शन केले, असे प्रभारी प्रकल्प संचालक उमेश कुलकर्णी म्हणाले.

Maha Awas Abhiyan
Tembhu Irrigation Scheme : ‘टेंभू’बाधित जमिनींचा मिळणार मोबदला

घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होतो. परंतु हा निधी पुरेसा नसल्याने लाभार्थी नावीन्यपूर्ण घरकुले उभारू शकत नाहीत. जिल्ह्याने लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी वित्तीय संस्था, स्वयंसहाय्यता समुहांद्वारे कर्ज मिळवून दिले. या उपक्रमात जिल्ह्यास राज्यस्तरावरील तृतीय क्रमांकांचा पुरस्कार प्राप्त झाला.

माळशिरस तालुक्यातील डेमो हाऊस मध्ये घरकुल कसे असावे, यासाठी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी डेमो हाऊस बांधण्यात आले. त्यासाठी निधी अपुरा पडत असल्याने सीएसआरमधून निधी मिळविला. याची दखल घेऊन जिल्ह्यास राज्यस्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

‘डाटा एन्ट्री’बाबत सन्मान

विशेष पुरस्कारात माळशिरस तालुक्यातील ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ यांनी वेळेवर लाभार्थ्यांना मंजुरी देणे, हफ्ते वितरित करणे, करारनामे करून घेणे व घरकुले पूर्ण करून घेणे, यामध्ये जिल्ह्यात माळशिरस तालुका अग्रेसर ठेवून उत्कृष्टरीत्या काम केले. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील तालुका डाटा एन्ट्री ऑपरेटर सुभाष स्वामी यांना विशेष पुरस्कार देण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com