Agriculture Mechanization : सोलापुरातील १५६३ शेतात पोहोचले ट्रॅक्टर

कोरोना कालावधीत ही योजना काहीशी ठप्प झाली होती. पण गेल्या वर्षी महाडीबीटीमार्फत ही योजना पुन्हा सुरू झाली.
Agriculture Tractor
Agriculture TractorAgrowon

Agriculture Scheme सोलापूर ः कृषी विभागाच्या (Agriculture Department) कृषी यांत्रिकीकरण (Agriculture Mechanization) उपअभियान योजनेतून सर्वाधिक अवजारांचा लाभ घेण्यात आणि अनुदानवाटपात (Subsidy) राज्यात सोलापूर जिल्हा दुसऱ्या स्थानावर राहिला असून, या योजनेतून सुमारे ८ हजार ८६३ विविध अवजारे शेतकऱ्यांना मिळाली आहेत. तर गेल्या वर्षभरात तब्बल १५६३ ट्रॅक्टर (Agrulture Tractor) शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले आहेत.

कोरोना कालावधीत ही योजना काहीशी ठप्प झाली होती. पण गेल्या वर्षी महाडीबीटीमार्फत ही योजना पुन्हा सुरू झाली. तेव्हा शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल या योजनांतील अवजारांकडे राहिला.

केंद्र शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण यांसारख्या तीन योजनांतून शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा लाभ दिला जातो.

केंद्र आणि राज्य शासन अशा दोघांच्या हिश्‍शातून ही योजना राबवली जाते. त्यात ट्रॅक्टरसह ट्रॅक्टरचलित नांगर, रोटाव्हेटर, पॉवर टिलर, फवारणी पंप, रिपर, रिपर कम बाइन्डर, थ्रेशर, पॉवर वीडर यांसारख्या विविध अवजारांचा समावेश आहे.

Agriculture Tractor
Agricultural Mechanization : शेतीमध्ये यांत्रिकीकरण काळाची गरज

ट्रॕक्टर वगळता अन्य अवजारांसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येते, तर ट्रॕक्टरसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक लाख रुपये आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सव्वा लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते.

या वर्षभरात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ट्रॕक्टरला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. त्यामुळेच जवळपास १५६३ ट्रॕक्टर शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले आहेत.

Agriculture Tractor
Agriculture Mechanization : शेतकऱ्यांची यांत्रिकीकरणाला पसंती

४२ कोटींचे अनुदान वाटले

कृषी यांत्रिकीकरण योजनेतून सोलापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात विविध अवजारांसाठी ८८६३ शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे.

या एकूण अवजारांपोटी सुमारे ४२ कोटी ८३ लाख ३५ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना वाटण्यात आले आहे.

सोलापूरला या योजनेसाठी मिळालेल्या निधीपैकी ९९ टक्के निधी खर्चण्यात जिल्ह्याने आघाडी घेत दुसरे स्थान मिळवले आहे.

याचपद्धतीने नाशिक, पुण्यानेही ९९ टक्के निधी खर्च करत दुसरे स्थान मिळवले आहे. राज्यात भंडारा जिल्ह्याने शंभर टक्के निधी खर्चत ८ कोटी १९ लाख रुपये वाटप करत पहिले स्थान मिळवले आहे

कृषी यांत्रिकीकरणाला शेतकरी प्राधान्य देत आहेत. आजची ती गरज झाली आहे. यापुढेही आम्ही तातडीने अशा विषयाला प्राधान्य देऊ. शेतीतील श्रम, वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळून उत्पन्न आणि खर्चाचा मेळ, यासाठी यांत्रिकीकरण हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com