Rojgar Hami Yojana : ‘रोहयो’अंतर्गत २१ लाख मजूर कुटुंबांना अकुशल काम

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्याचा मागील वर्षाचा खर्च रुपये २४०० कोटी होता. तो यावर्षी ३४०० कोटी करण्यात आला आहे.
Employment Guarantee Scheme
Employment Guarantee Scheme Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) राज्याचा मागील वर्षाचा खर्च रुपये २४०० कोटी होता. तो यावर्षी ३४०० कोटी करण्यात आला आहे. या अंतर्गत २१ लाख मजूर कुटुंबांना अकुशल स्वरूपाचे काम दिले आहे. योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी वेगवेगळे लोकाभिमुख निर्णय घोषित केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते ‘देवगिरी मैदान’ पोलीस आयुक्त कार्यालय येथे ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडला. त्या वेळी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते. या वेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती

Employment Guarantee Scheme
Rojgar Hami Yojana : ‘रोहयो’त आता फळबाग, फुलपीक लागवड करता येणार

पालकमंत्री म्हणाले, की विहिरींची संख्या, अंतराची अट, भूजल प्रमाणपत्र रद्द केले आहे. वृक्ष लागवडीअंतर्गत मोहोगणी, मिलीया डुबिया सारखी वृक्ष लागवड व जवळपास ७० प्रकारचे वृक्ष लागवड, वन औषधी व ड्रॅगनफ्रुट, केळी, द्राक्षतसेच फुल पिकेदेखील योजनेतून घेण्यात येत आहेत.

‘मनरेगा’अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना घोषित केली असून १ किलोमीटर कामासाठी रुपये २४ लाख अनुदान देण्यात येते. राज्यामध्ये जवळपास ३८ हजार किलोमीटर रस्ते मंजूर केलेले असून त्यापैकी जिल्ह्यामध्ये ४ हजारर किलोमीटर रस्ते मंजूर केले जे राज्यामध्ये सर्वाधिक आहेत.

जिल्ह्याचा मागच्या वर्षीचा खर्च ९९ कोटी रुपये होता. तो या वर्षी १७० कोटी झालेला आहे. राज्यात खर्चानुसार आपल्या जिल्हाचा ५ वा क्रमांक आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गुरांचे गोठे मंजूर केले असल्याचेही या वेळी ते म्हणाले.

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे...

- कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाख ४० हजार लाभार्थ्यांना लाभ

- प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत २६ हजार शेतकरी लाभार्थ्यांना लाभ

- पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये जिल्हा प्रथमस्थानी

- प्रकल्पामधून १ लाख १३ हजार शेतकऱ्यांना अनुदानवाटप

- शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत १७५ प्रस्तावांना मंजुरी

- पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत ९२७ उद्योजकांना कर्ज

Employment Guarantee Scheme
Rojagar Hami Yojana : नांदेड जिल्ह्यात ‘रोहयो’च्या कामांवर मजुरांची संख्या वाढतेय?

- ७५ वर्षांवरील ३६ लाख नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला

- प्रवास भाड्यात सवलतीचा १४ लाख ३० हजार महिलांनी घेतला लाभ

- जिल्ह्यात अंदाजे १० लाख ६० हजार‘आनंदाचा शिधा’ किटचे वाटप

- सरासरी दरमहा २२ लाख ४० हजार लाभार्थ्यांना मोफत धान्याचा लाभ

- ६१ शिवभोजन केंद्रांमधून दैनदिन ७ हजार शिवभोजन थाळी

- २५ तृतीयपंथीयांना रेशन कार्ड, ४७ जणांना ओळखपत्र

- ऊस तोड कामगार कल्याणमंडळांतर्गत दीड हजार कामगारांना ओळखपत्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com