Gharkul Scheme : अखेर घरकुलाची प्रतीक्षा संपली

शबरी आदिवासी घरकुल योजना ही आदिवासी उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जमातीमधील लाभार्थींसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
Gharkul Scheme
Gharkul SchemeAgrowon

अलिबाग : तालुक्यातील कुर्डुस परिसरातील तब्बल १०५ आदिवासी बांधवांची घरकुलाची (Gharkul Scheme) प्रतीक्षा संपली आहे. शबरी आदिवासी योजनेतून (Shabri Tribal Scheme) २६९ चौरस फुट क्षेत्राची घरकुले अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभांगी नाखले यांनी मंजूर केली आहेत.

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांच्या मार्गदर्शनासाठी तालुका संघटक तुषार शेरमकर, कुर्डुस ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सूर्यकांत केणी यांनी विक्रमी स्वरूपात घरकुले मंजूर करून घेतली आहेत.

काही दिवसांतच या घरकुलांचे काम सुरू होणार असल्याने आदिवासी वाड्यांवर आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

Gharkul Scheme
Gharkul Yojana : नोंदणीकृत कामगारांना घरकुल देणार

शबरी आदिवासी घरकुल योजना ही आदिवासी उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जमातीमधील लाभार्थींसाठी सुरू करण्यात आलेली आहे. पात्र असलेल्या नागरिकांसाठी २६९ चौरस फूट क्षेत्रफळाचे पक्के घरकुल सरकाकरडून बांधून दिले जाते.

Gharkul Scheme
Gharkul Yojana : शिरूरमध्ये ९२३ घरकुलांना अडीच लाखांचा निधी मंजूर

अलिबाा तालुक्यातील कुर्डुस परिसरातील अशा १०५ आदिवासी बांधवांनी उत्पन्नाचा दाखला, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र यांसह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे. हे सर्व आदिवासी या योजनेसाठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र अलिबाग पंचायत समितीने दिले आहे.

मोलमजुरी करणारे हे आदिवासी आतापर्यंत दगडमातीच्या तात्पुरत्या स्वरूपातील घरात राहत होते. सरकारकडून पक्की घरकुले बांधून मिळणार असल्याने या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

आज अलिबाग तहसील कार्यालयात येऊन या सर्वांनी सरकारला बंधपत्राद्वारे आपली कागदपत्रे सादर केली. अनेक वर्षांपासून कच्च्या घरात राहणाऱ्या या सर्वांची स्वप्नपूर्ती झाल्याने या सर्वांनी शिवसेनेचे तालुका संघटक तुषार शेरमकर, सूर्यकांत केणी यांचे आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com