मोरगावात पुरंदर उपसा योजनेच्या पाण्याची चाचणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आदर पूनावाला सिरम इन्स्टिट्यूटच्या १.३२ कोटी निधी सीएसआर निधीतून पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाइपलाइनसाठी निधी मंजूर झाला होता.
Water
WaterAgrowon

मोरगाव, जि. पुणे ः जिरायती मोरगाव परिसरात पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या (Purandar Water Scheme) पाइपलाइनचे काम पूर्णत्वास आले आहे. शेतकरी, पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या योग्य समन्वयामुळे केवळ चाळीस दिवसांत ३.९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या पाण्याची चाचणी (Water Testing) झाल्याने शेतकरी आनंदी झाले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या माध्यमातून आदर पूनावाला सिरम इन्स्टिट्यूटच्या (Adar Poonawala Serum Institute) १.३२ कोटी निधी सीएसआर निधीतून पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाइपलाइनसाठी निधी मंजूर झाला होता. या पाइपचे काम पूर्णत्वास येत असून, योजनेमुळे मोरगाव परिसरातील ढोलेमळा, पाटील बुवा मळा, चोपणवस्ती, तावरेवस्ती, हनुमाननगर सोनारशेत येथील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या योजनेमुळे अंदाजे ४५० ते ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच अंदाजे १५० से २०० शेतकरी कुटुंबाचे आर्थिक जीवनमान उंचावणार आहे. या योजनेसाठी शेतकरी, ग्रामपंचायत, सिंचन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच व इतर ठिकाणी पत्रव्यवहार व पाठपुरावा इतर बाबींसाठी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांनी योग्य असा समन्वय साधून योजना पूर्ण करणेसाठी विशेष योगदान व सहकार्य केले आहे.

हे पूर्ण झाले असून या कामाची चाचणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सैनिक सेलचे नवनियुक्त पुणे शहराध्यक्ष अविनाश ढोले व सर्व शेतकरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या योजनेमुळे मोरगाव व परिसरातील वाडीवस्ती- वरील शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

या कामासाठी शेतकरी अनिल ढोले, चांगदेव ढोले, गणेश ढोले, अविनाश ढोले, हनुमंत ढोले, अंकुश ढोले, विठ्ठल ढोले, त्रिंबक खोपडे, सखाराम तावरे, विजय ढोले, नारायण तावरे, विलास तावरे, महादेव ढोले, अभिजित ढोले तसेच मोरगावचे विद्यमान सरपंच निलेश केदारी, माजी सरपंच पोपट तावरे व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष कष्ट घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com