PM Kisan Yojna: पीएम किसानचा १४ वा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांनो केवायसी पूर्ण केली का?

२०१९ च्या निवडणूकांच्या पूर्वी केंद्र सरकारने पीएम किसानचा पाहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता.
PM Kisan
PM KisanAgrowon

PM Kisan Scheme : केंद्र सरकारने अलीकडेचे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (पीएम किसान) १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला आहे. आता १३ हप्त्यानंतर शेतकऱ्यांना १४ हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे.

केंद्र सरकारकडूनही १४ हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची पूर्वतयारी करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेची रक्कम जमा होणार आहे.

२०१९ च्या निवडणूकांच्या पूर्वी केंद्र सरकारने पीएम किसानचा पाहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. पीएम किसान अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये जमा करते. दर चार महिन्याच्या अंतरा २ हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो. 

PM Kisan
PM Kisan : दीड हजार शेतकऱ्यांची शेतीच मिळेना!

यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राबरोबर राज्य सरकारदेखील शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार देणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी निधीही प्रस्तावित केला आहे.

त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता वार्षिक १२ हजार रुपये मिळणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अलिकडेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेतून अधिकचा लाभ शेतकऱ्यांना देण्याचेही संकेत विधानसभेत दिले होते. 

केंद्र सरकारने २७ फेब्रुवारीला पीएम किसानचा १३ वा हप्ता जमा केला होता. त्यासाठी १६ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. तसेच  ८ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे सांगितले आहे.

पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. 

PM Kisan
PM kisan Scheme : पीएम किसान योजनेतील गोंधळ कायम

केवायसी करण्यासाठी काय कराल?

पीएम किसान अधिकृत pmkisan.gov.in ला भेट द्या. त्यावर उजव्या बाजूला  e-KYC चा पर्याय दिसेल. त्यावर शेतकऱ्यांनी मोबाइल नंबर द्यायचा आहे.

मोबाइल नंबर रजिस्टर्ड केल्यास मोबाईलवर ओटीपी येईल. तो रकण्यात भरून एन्टर बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर सबमिट पर्यायवर क्लिक केल्यानंतर केवायसी पूर्ण होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com