पीकविमा अटी शिथिलतेसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

पीकविमा भरपाईबाबत ‘बीड पॅटर्न’ स्वीकारल्यानंतर देखील काही नियम आणि अटी या जाचक ठरतात. त्या शिथिल कराव्यात यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी (ता. २०) पत्रकार परिषदेत दिली.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

अमरावती : पीकविमा (Crop Insurance) भरपाईबाबत ‘बीड पॅटर्न’ (Beed Pattern) स्वीकारल्यानंतर देखील काही नियम आणि अटी या जाचक ठरतात. त्या शिथिल कराव्यात यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शनिवारी (ता. २०) पत्रकार परिषदेत दिली. अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Abdul Sattar
Crop Protection : हळद, आले पिकातील कीड नियंत्रण

कृषिमंत्री म्हणाले, की पीकविम्याची भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांना संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीशी फोनवर संपर्क साधावा लागतो तशी पूर्वसूचना त्यांना द्यावी लागते. मात्र कंपनी प्रतिनिधीचे फोन कधी बंद राहतात तर कधी ऑनलाइन प्रोसेस नेटवर्क अभावी होत नाही. त्यावर पर्याय म्हणून ऑफलाइन पूर्वसूचना स्वीकारण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संबंधित तालुका कृषी कार्यालयात त्याकरिता चार जणांची नियुक्ती केली जाईल. त्यांच्या माध्यमातून ऑफलाइन पीकविमा प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. हे प्रस्ताव विमा कंपन्यांनी मान्य करावे, असे आदेश दिले जातील.

Abdul Sattar
Crop Damage : वर्धा जिल्ह्यात १२२ कोटी रुपयांचे नुकसान

पीक नुकसानीची पूर्वसूचना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देखील स्वीकारण्याची प्रक्रिया या पुढील काळात राबविली जाणार आहे. त्यासोबतच काही नियम आणि अटी अद्यापही जाचक ठरतात. भरपाई मिळण्यासाठी ते अडचणीचे ठरत असल्याने त्यात बदल करावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली जाणार आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या समन्वयातून ही प्रक्रिया राबविली जाईल. शेतकऱ्यांना वाढीव निकषानुसार भरपाई देण्याचे प्रस्तावित आहे. त्या संदर्भातील आदेश सोमवारी (ता. २२) मुख्यमंत्री काढतील. राज्यात पीककर्ज वितरणाबाबत कोणतीही तक्रार नसल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

जंगलांच्या सीमेवर चर खोदणार

वन्य प्राण्यांचा शेतातील उभ्या पिकाला फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. त्यावर उपाय म्हणून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जंगलांच्या सीमेवर चर खोदण्यात येतील. त्यामुळे वन्य प्राण्यांकरिता पाणी उपलब्ध होईल त्यासोबतच ते गावात किंवा शेतात येण्यास प्रतिबंध लागेल, असेही कृषिमंत्री सत्तार यांनी या वेळी सांगितले. यापूर्वीच्या कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना अनुदानावर कुंपण देण्याची घोषणा केली होती. त्याविषयी विचारणा केली असता सरकार बदलल्यानंतर धोरणात बदल होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com