'टेक्सवॅली'मुळे कापड उद्योग एकाच छताखाली येणार ?

होलसेल कापड व्यापाराच्या माध्यमातून बिझनेस-टू-बिझनेस (बी2बी) तसेच बिझनेस-टू-कस्टमर (बी2सी) मॉडेल एकाच बाजारपेठेत उभं करून देशभरातील ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न टेक्सवॅलीने केलाय.
'टेक्सवॅली'मुळे कापड उद्योग एकाच छताखाली येणार ?
Tex ValleyAgrowon

इरोड शहराजवळील सालेम-कोईमतूर हायवेवर असणारी ही बाजारपेठ २० लाख चौरस फुट एवढ्या मोठ्या जागेत उभी आहे. तसंच ही नेहमीच्या बाजारपेठेसारखी नाही. तर होलसेल कापड व्यापाराच्या माध्यमातून बिझनेस-टू-बिझनेस (बी2बी) तसेच बिझनेस-टू-कस्टमर (बी2सी) मॉडेल एकाच बाजारपेठेत उभं करून देशभरातील ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न टेक्सवॅलीने केलाय. मोठा मॉल, लाईफ स्टाईल मार्केट, मल्टिप्लेक्स, फुड कोर्ट, हॉटेल्स असा मोठा पसारा आहे या बाजारपेठेचा.

तामिळनाडू सरकारने ही बाजारपेठ उभारण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी त्यासाठी २००९ मध्ये एक विशेष कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल) स्थापन केली. सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) इरोड टेक्स्टाईल मॉल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू करण्यात आली. त्यामध्ये तामिळनाडू सरकार आणि लोटस ग्रुप व युआरसी ग्रुप यांची गुंतवणूक आहे.

"देशभर विखुरलेल्या कापड उद्योगाला एकाच छताखाली आणायचं झाल्यास टेक्सवॅली सारख्या संस्थांची उभारणी गरजेची आहे, जिथं या उद्योगाला आवश्यक सर्व प्रक्रियांचे एकत्रीकरण करता येईल. ग्राहकांच्या मागणीनुसार आम्हाला सातत्याने नवीन गोष्टी, बदल स्वीकारावे लागतील, " असे इरोड टेक्स्टाईल मॉलचे उपाध्यक्ष देवराजन. सी. यांनी सांगितले.

टेक्सवॅली आता एका नवीन अवतारात आपल्याला बघायला मिळणार आहे. चार लाख चौरस फुटात पसरलेल्या बिझनेस टू कस्टमर मॉडेलमधून लाइफस्टाइल मार्केटची सुरुवात टेक्सवॅलीमध्ये होत आहे. यामध्ये हायपरमार्केट सोबत, 5 स्क्रीन्सचे मल्टिप्लेक्स, 500 लोकांच्या क्षमतेचे फूड कोर्ट, शंभरहून अधिक व्हॅनिला आउटलेट, पाच फाईन डाईन रेस्टॉरंट २५ खोल्यांचे हॉटेल व मनोरंजनासाठी अद्ययावत केंद्र सुरू करण्यात येईल.

या भागात बिझनेस टू कस्टमर आणि लाइफस्टाइल आऊटलेटना चांगला प्रतिसाद मिळाल्याने राज्याचे उत्पन्न वाढण्यात देखील हातभार लागत आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत ४५० कोटी रूपये खर्च केले आहेत. प्रकल्प अद्ययावत करण्यासाठी आणखी शंभर कोटी रुपये खर्च करण्यात येतील, असे टेक्सवॅलीचे व्यवस्थापकीय संचालक पी. राजशेखर यांनी सांगितलं. बी2बी व बी2सी मॉडेलमुळे ग्राहकांची वर्दळ वाढणार आहे.

कोविड सुरू होण्यापूर्वीच्या एका महिन्यात ६० हजार ग्राहकांनी मार्केटला भेट दिली होती. येत्या दोन वर्षात पाच लाख ग्राहकांनी इथे भेट द्यावी, असं उद्दीष्ट आहे, असंही राजशेखर यांनी सांगितलं.

तीन विभाग एकाच छताखाली

मॉल डिझाईन क्षेत्रात काम करणाऱ्या बियोंड स्क्वेअरफीट या सल्लागार कंपनीने टेक्सवॅलीचा कायापालट करण्यात सुरुवात केली आहे. बिझनेस-टू-बिझनेस चालणाऱ्या कापड उद्योगाला या टेक्सवॅलीमध्ये महत्वाचे स्थान आहे. होलसेल व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना या मार्केटमध्ये भाडेतत्वावर गाळे घेता येतात.

बिझनेस-टू-कस्टमर व्यापार नेण्यासाठी टेक्सव्हॅल्यू नावाचे मॉल तयार केला जात आहे ज्यामध्ये मोठ्या ब्रँड्सचे आउटलेट भाडेतत्त्वावर दिले जातील. या आउटलेटमध्ये ४० ते ७० टक्के एवढी सवलत अगदी वर्षभर मिळणार आहे. तिसरा विभाग आहे बिग बॉक्स बाजार ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक, फर्निचर, खेळणी यासारखे होलसेल व रिटेल आउटलेट असणार आहेत

टेक्सवॅलीतील व्यापाराचा विस्तार आम्हाला देशभर करायचा आहे. पुढील सहा ते आठ महिन्यांत भारतातील सर्वच कापड उद्योग टेक्सवॅलीमध्ये सहभागी असेल असा आम्हाला विश्वास आहे असे बियोंड स्क्वेअरफीटचे चीफ मॉल मेकॅनिक सुशील डुंगरवाल यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com