
Washim News : तलावातील पाण्याची साठवणक्षमता वाढावी आणि तलावातील सुपीक गाळ काढून शेतात टाकून जमिनीची उत्पादनक्षमता वाढावी यासाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियान शासनाने सुरू केले आहे. या अभियानाचा प्रारंभ जिल्ह्यात कारंजा तालुक्यातील काजळेश्वरजवळील तलाव परिसरात लोकसहभागातून करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषद समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे, कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे, तहसीलदार कुणाल झालटे, काजळेश्वरचे सरपंच नितीन उपाध्ये, उपसरपंच तौसिमोद्दीन, जानोरीचे सरपंच अमोल भिंगारे, ए. टी. उपाध्ये, विनोद उपाध्ये, सुभाष उपाध्ये, गजानन भड, नईम शेख, मंडळ अधिकारी जी. बी. मनवर, तलाठी संजय आडे, कृषी सहायक अनिल राठोड, ग्रामसेवक सतीश वरघट व अभियंता श्री. पेरवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विशेष म्हणजे काजळेश्वर तलावातील गाळ शेतकरी स्वयंस्फूर्तीने घेऊन जात आहे. शेतकरी लोकवर्गणीतून गाळ काढण्यासाठी जेसीबीचा वापर करीत आहे. हे शेतकरी आपापल्या ट्रॅक्टरने शेतात गाळ टाकत आहेत.
तलावातील गाळाचे महत्त्व शेतकरी जाणून असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी स्वखर्चाने तलावातील गाळ शेतात नेऊन पसरवीत आहे. त्यामुळे तलावातील गाळ शेतात टाकल्याने शेतीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.