निधीअभावी दोन हजार सिंचन विहीरी रखडल्या

यंदा अतिवृष्टीने खरिपाचे पीक हातून गेले आहे. शिल्लक राहिलेल्या पिके पिवळी पडू लागल्याने उत्पन्न होईल, याचा काही नेम नाही. त्यामुळे भिस्त आता रब्बी पिकावर आहे.
Irrigation
IrrigationAgrowon

आर्वी, वर्धा : ‘धडक सिंचन योजने’अंतर्गत (Irrigation Scheme) दोन हजार शेतकऱ्यांना वर्धा जिल्ह्यात विहिरी (Irrigation Wells) मंजूर केल्या आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी (Fund) उपलब्ध न झाल्याने गत अडीच वर्षांपासून विहिरींचे काम रखडले आहे. आता भाजपचे सरकार आहे. योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना तातडीने निधी मंजूर करून द्यावा, असे पत्र आमदार दादाराव केचे यांनी राज्य शासनाला पाठविले आहे.

Irrigation
Irrigation Scam : ठिबक घोटाळ्याची फाइल पुन्हा उघडली

यंदा अतिवृष्टीने खरिपाचे पीक हातून गेले आहे. शिल्लक राहिलेल्या पिके पिवळी पडू लागल्याने उत्पन्न होईल, याचा काही नेम नाही. त्यामुळे भिस्त आता रब्बी पिकावर आहे. मात्र आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना कोण कर्ज देईल, असा ही प्रश्न पडला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ‘धडक सिंचन योजने’व्दारे शेतकऱ्यांच्या कोरडवाहू जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित केली होती. या योजनेच्या माध्यमातून कोरडवाहू शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाली होती. परंतु, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या योजने अंतर्गत मंजूर लाभार्थींना निधी उपलब्ध करून देणे बंद केले.

Irrigation
Irrigation: झारखंडकडून सिंचनासाठी आर्थिक पॅकेजची मागणी

शेतकऱ्यांनी उसनवारी करून, सोने गहाण ठेवून कसाबसा पैसा उभारून शेती ओलिताखाली येणार व उत्पन्नात वाढ होईल, या आशेवर शेतात शासकीय नियमानुसार विहिरीचे बांधकाम केले. परंतु सरकार पालटले. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आणि या योजनेत निधी देने बंद करून शेतकऱ्यांना पंचायत समितीच्या चकरा मारण्यास लावले. पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्याने आमदार केचे यांनी ‘धडक सिंचन योजना’ अंतर्गत मंजूर लाभार्थी शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळावेत, यासाठी मागणी केली आहे.

आर्वी क्षेत्रात १२५० लाभार्थी

शेतकऱ्यांसाठी ‘धडक सिंचन योजना’ भाजप सरकारने आणली होती. परंतु, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकारने मंजूर लाभार्थींना गत अडीच वर्षात ताटकळत ठेवले. त्यामुळे ‘धडक सिंचन योजनेंतर्गत’ मंजूर जिल्ह्यातील दोन हजार तर आर्वी क्षेत्रातील १२५० लाभार्थींना तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार दादाराव केचे यांनी राज्य शासनाला पत्रातून केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com