लिंग वर्गीकृत विर्यमात्रेचा वापर कोणामध्ये प्रभावी?

लिंग निर्धारित वीर्यमात्रा, ज्याला इंग्रजीमध्येसेक्स सॉर्टेड सीमेनतंत्रज्ञानअसं म्हंटल जाते. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपल्या गोठ्यात कमी वेळात जास्तीत जास्त मादी वासरे जन्माला येऊ शकतात.
Sex Sorted Semen
Sex Sorted Semen

सेक्स सॉर्टेड सीमेन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या गोठ्यात कमी वेळात जास्तीत जास्त मादी वासरे जन्माला येऊ शकतात. सध्या आपल्याकडे जास्त दूध उत्पादनासाठी संकरित आणि विदेशी जनावरांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. अशा जनावरांचे गोऱ्हे आपण शेतीकामासाठी आपण वापरू शकत नाही. सोबतच शेतीचही यांत्रिकीकरण झाल्याने नर वासरांची आवश्यकता कमी झालेली दिसून येते.

आपण आपल्या गोठ्यातील जनावरांच पशुवैद्यकामार्फत कृत्रिम रेतन केलं असेलचं न? कृत्रिम रेतन करताना साधारण विर्यमात्रा आणि लिंग आधारित विर्यमात्रा यांच्यात काय फरक असतो बर? तर मुळात न, वळुच्या विर्यात X आणि Y असे दोन प्रकारचे शुक्राणू आढळून येतात. X गुणसूत्राचे फलन झाल्यास मादी वासरू जन्माला येते, याउलट Y गुणसूत्राचे फलन झाल्यास नर वासराचा जन्म होतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वळूच्या वीर्यातील X आणि Y गुणसूत्रे असलेले शुक्राणू वेगळे करता येतात. म्हणजेच लिंग निर्धारित विर्यमात्रेत फक्त X गुणसुत्रे असणारे शुक्राणू असतात. यामुळे ९० टक्क्याहून जास्त प्रमाणात मादी वासरेच जन्माला येत असतात. बरेचदा लिंग निर्धारित विर्यमात्रेचा वापर आपण सरसकट सर्व माजावर आलेल्या गायीमध्ये करू शकत नाही? किंवा त्याचा वापर फक्त पहिलारू कालवड किंवा उच्च वंशावळ असलेल्या जनावरांमध्ये करावा असा अट्टहास केला जातो? असं का? तर साधारण कृत्रिम रेतन करताना त्यातील शुक्राणुंची संख्या हि अब्जावधीमध्ये असते. याउलट लिंग निर्धारित विर्यमात्रेमध्ये Y शुक्राणू काढून टाकल्याने त्यातील हव्या असलेल्या X शुक्राणुंची संख्या कमी झालेली असते. म्हणूनच निरोगी, सुदृढ गर्भाशय असलेल्या जनावरांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी ठरतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com