सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कालवश 

एक मातब्बर सहकार तज्ज्ञ, पाणी प्रश्नावर शेवटपर्यंत लढा देणारे व सर्व विषयांचा गाढा अभ्यास असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. येसगावचे सरपंच ते मंत्री आणि इतरही अनेक महत्वाच्या संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी मजल मारली. त्यांना विविध पुरस्कार मिळाले. विविध विषयांवरील त्यांची पुस्तकेही आहेत. विविध क्षेत्रातील अभ्यासासाठी त्यांनी परदेश दौरे केले.
Shankarrao Kolhe passed away
Shankarrao Kolhe passed away

सहकारमहर्षी आणि राज्याचे माजी सहकार मंत्री शंकरराव कोल्हे (Shankarrao Kolhe ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.  ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने सहकारी साखर उद्योगात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

एक मातब्बर सहकार तज्ज्ञ, पाणी प्रश्नावर शेवटपर्यंत लढा देणारे व सर्व विषयांचा गाढा अभ्यास असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.

बीएस.सी ॲग्री झालेल्या कोल्हे यांनी विदेशातील नोकरीची संधी नाकारून त्यांनी सामाजिक क्षेत्रात योगदान देण्याचा निर्णय घेतला. वयाच्या २१ व्या वर्षी येसगावचे सरपंच म्हणून निवडून येत त्यांनी राजकीय प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली. १९५९ साली त्यांनी कोपरगाव सहकारी साखर कारखान्याची स्थापना (Kopargao Sugar Factory)करून त्याचे अध्यक्षपद भूषविले.

व्हिडीओ पहा- 

१९६२ साली त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे (Sanjivani Sugar Facory) संस्थापक म्हणून उभारणी करून चेअरमनपद भूषविले. सहकारी कारखानदारी व शेतकरी टिकावा म्हणून त्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करत रासायनिक प्रकल्पासह वीज निर्मिती, उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करत देशाचे पंतप्रधान यांचे लक्ष वेधले. इतर कारखान्यांना आदर्शवत मार्गदर्शन केले.

राज्यासह तालुक्याच्या विकासाचा सतत ध्यास घेतल्याने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. अनेक वर्षे त्यांनी तालुक्याचे आमदार म्हणून कार्य करताना मंत्री मंडळात पदे भूषवून आपली वेगळी छाप पाडली. शेतकऱ्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये या तळमळीने तालुक्यात शैक्षणिक हब निर्माण केला.यशवंत कुकुट व गोदावरी दूध संघाची स्थापना करत शेतीला जोडधंदा उपलब्ध करून दिला. शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेवर त्यांना संधी दिली त्याचे सोने करत रयतेचे जाळे राज्यभर पसरवण्यात कोल्हे यांचा मोठा वाटा आहे. रयत शिक्षण संस्थेचे त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.

येसगावचे सरपंच ते मंत्री आणि इतरही अनेक महत्वाच्या संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी मजल मारली. त्यांना विविध पुरस्कार मिळाले. विविध विषयांवरील त्यांची पुस्तकेही आहेत. विविध क्षेत्रातील अभ्यासासाठी त्यांनी परदेश दौरे केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com