शेती विकासासाठी स्मार्ट प्रकल्प, शेतकरी उत्पादक कंपनी

राज्यात ज्या सामाजिक भांडवल व सुविधा निर्माण होत आहेत त्याआधारे देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील संधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देऊन शेतीतून आधिकाधिक नफा मिळवून देण्यासाठी नियोजन व संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे.
vegetable cultivation
vegetable cultivation

राज्यात जागतिक बँक अर्थसाह्याने “मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART)” राबविण्यास मान्यता दिली.

स्मार्ट प्रकल्प  राज्यात ज्या सामाजिक भांडवल व सुविधा निर्माण होत आहेत त्याआधारे देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील संधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देऊन शेतीतून आधिकाधिक नफा मिळवून देण्यासाठी नियोजन व संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. तसेच सर्वसाधारण महिलांचा कृषी क्षेत्रामध्ये मंजूर तसेच तत्सम निम्न स्तरावरील कामामध्ये लक्षणीय सहभाग आहे, परंतु कृषिमूल्य साखळीच्या वरच्या स्तरावर महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढविणे आवश्यक आहे. त्याकरिता राज्यात जागतिक बँक अर्थसाह्याने “मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART)” राबविण्यास मान्यता दिली.

प्रकल्पाचा उद्देश राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आणि कृषी उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून “स्पर्धात्मक व सर्वसमावेशक कृषी मूल्यसाखळ्या विकसित करणे” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्पादक आणि उद्योजकांना नवीन व संघटित बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक ते तांत्रिक साह्य, पायाभूत सुविधा आणि जोखीम निवारण क्षमता विकसित करण्यासाठी गुंतवणूक करण्यात येणार  आहे.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ प्रकल्प अंमलबजावणी कक्ष  सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी कक्षाची निर्मिती करण्यात आली असून कृषी व्यवसाय विकास आणि बाजारपेठेत प्रवेश आणि जोखीम निवारण्याची व्यवस्था उभी करणे या घटकांतर्गत गोदामांचे नूतनीकरण प्रकल्प या घटकांची अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे नोडल एजन्सी म्हणून कामकाज करणार आहे. 

महाफार्म 

  • महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाशी संलग्न सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला गट इत्यादी संस्थांमार्फत उत्पादित करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांची विक्री करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, यासाठी महामंडळाने महाफार्म या नावाने स्वत:चा ब्रँड निर्माण केला आहे. 
  •  या माध्यमातून सदर संस्थांनी उत्पादित केलेला माल विक्री करणे, त्याचे मार्केटिंग करण्याचे कार्य महामंडळामार्फत करण्यात येते. यामुळे या संस्थांच्या उत्पादनांना राज्यस्तरीय बाजार पेठेत स्थान मिळणे शक्य झाले आहे. भविष्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सदर उत्पादने पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. सद्यःस्थितीत ३३ शेतीमाल उत्पादने नोंदणीकृत झाली आहेत. उर्वरित शेतीमाल उत्पादने समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे.  
  • कॉपशॉप योजना 

  • महामंडळामार्फत मार्केटिंग करण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी विक्री व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने राज्यात विविध सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून शॉप उभारणी करण्यात येत आहे. 
  • यामुळे सहकारी संस्थांनी उत्पादित केलेली उत्पादने स्थानिक पातळीवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. सद्यःस्थितीस प्रायोगिक तत्त्वावर राज्यात विविध गृहनिर्माण / सोसायटींच्या माध्यमातून पाच शॉप उभारण्यात आले आहेत. 
  • सदर शॉपच्या माध्यमातून शेतकरी समूहाद्वारे (सहकारी संस्था/ शेतकरी उत्पादक कंपनी/ बचत गट) उत्पादित कृषी मालाच्या विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भविष्यामध्ये याची व्याप्ती वाढविण्याचा महामंडळाचा मानस आहे. 
  • शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व व्यवसाय वृद्धी

  • महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीचे स्थापना करणे, त्याचे बळकटीकरण करणे, व्यवसाय आराखडा तयार करून विविध उपलब्ध योजनांच्या माध्यमातून व्यवसायाची उभारणी करण्यात येत आहे.
  • निर्माण झालेल्या उत्पादित मालाला बाजारपेठेशी जोडणे, याचबरोबर कंपनी संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक ते कंपनी कायदयाप्रमाणे प्रशिक्षण देणे, कंपनी कायदयाच्या वैधानिक प्रतिपूर्ती करणे याबाबत संपूर्ण मार्गदर्शन शेतकरी उत्पादक कंपनीचे कामकाज व उभारणी महामंडळाच्या माध्यमातून चालू आहे.
  • नाबार्ड रिसोर्स सपोर्ट एजन्सी अंतर्गत २८ शॉपींना शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पनेचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. या माध्यमातून १४० शेतकरी उत्पादक कंपनीचे बळकटीकरण व व्यवसाय वृद्धीसाठी महामंडळ मदत करीत आहे. 
  • - हेमंत जगताप, ८२७५३७१०८२ (लेखक  महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय  संचालक आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com