Milk Business : गाई, म्हशींच्या दूध वाढीसाठी बायपास प्रथिनांचे तंत्र काय आहे?

Dairy Business : जनावरांना चाराटंचाईच्या काळात हवी तेवढी प्रथिने मिळत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादनात घट होते. हे टाळण्यासाठी खाद्यातून प्रथिने मिळविण्यासाठी बायपास प्रथिनांचा समावेश करावा लागतो. प्रथिनांचा आहारात वापर आणि जनावरांच्या पोटात आहारातून गेलेल्या प्रथिनांचा वापर कसा आणि किती प्रमाणात होत आहे हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
Milk Busniss
Milk BusnissAgrowon

डॉ. संजय भालेराव, डॉ. समाधान गरंडे, डॉ. विकास सरदार

Milk Rate : गाई आणि म्हशींची शारीरिक वाढ, प्रजोत्पादन, गर्भाची वाढ, कासेतील ग्रंथीच्या योग्य वाढीसाठी तसेच व्याल्यानंतर दूध निर्मितीसाठी प्रथिने, ऊर्जा, खनिजे, जीवनसत्त्वे या सर्व अन्नघटकांची योग्य प्रमाणात गरज असते. प्रथिनांचा जनावरांच्या आहारात योग्य प्रमाणात वापर केला तर खाद्य पदार्थांवर होणारा अतिरिक्त खर्च कमी करता येतो आणि दूध उत्पादनात वाढ मिळते.

जनावरांना चाराटंचाईच्या काळात हवी तेवढी प्रथिने मिळत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादनात घट होते हे टाळण्यासाठी खाद्यातून प्रथिने मिळविण्यासाठी बायपास प्रथिनांचा समावेश करावा लागतो. प्रथिने हा जनावरांच्या आहारातील सर्वांत महत्त्वाचा तसेच महाग घटक आहे. प्रथिने उत्तम आरोग्यासाठी तसेच अधिकाधिक दूध उत्पादनासाठी अतिआवश्यक घटक आहे.

प्रथिनांचा आहारात वापर आणि जनावरांच्या पोटात आहारातून गेलेल्या प्रथिनांचा वापर कसा आणि किती प्रमाणात होत आहे हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रथिनांचे मुख्य स्रोत तेलविरहित पेंड (सरकी, गवार, शेंगदाणा, सोयाबीन आणि सूर्यफूल) इत्यादींचा समावेश होतो.

प्रथिनांचे पचन

१) दुग्धजन्य जनावरांच्या पोटात चार कप्पे असतात. पहिले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘रुमेन’ जेथे बहुतेक खाद्य पदार्थ विघटित होतात. जनावरांना दिले जाणारे सुमारे ६० ते ७० टक्के आहारातील प्रथिनयुक्त पदार्थ रुमेनमधील अमोनियामध्ये परावर्तित होतात.

या अमोनियाचा एक महत्त्वपूर्ण भाग युरियाच्या स्वरूपात मूत्राद्वारे उत्सर्जित केला जातो. अशा प्रकारे, महागड्या पेंड किंवा खाद्यघटकातील प्रथिनांचा मोठा भाग वाया जातो.

Milk Busniss
Milk Business : हातकणंगले तालुक्यातील कल्पना मोहितेंनी दुग्ध व्यवसायातून साधली आर्थिक प्रगती

२) आहारातील प्रथिनयुक्त खाद्यघटकांना योग्य उपचार दिले तर रुमेनमधील प्रथिनांचा ऱ्हास कमी करता येतो. रुमेनमधील ऱ्हासापासून आहारातील प्रथिनांचे संरक्षण करण्यासाठी बायपास प्रथिने दिली जातात.

बायपास प्रथिनांमुळे प्रथिनयुक्त खाद्यघटक लहान आतड्यात अधिक कार्यक्षमतेने पचवले जातात. परिणामी, दूध उत्पादनासाठी अतिरिक्त प्रथिने उपलब्ध होतात. हे जनावरांना अधिक दूध आणि चांगल्या दर्जाचे दूध उत्पादन करण्यास मदत करते.

३) आहारातील प्रथिने दोन प्रकारची असतात, एक प्रकार म्हणजे जनावरांच्या पोटात पचन होणारी प्रथिने (RDP) आणि दुसरा प्रकार म्हणजे पोटात पचन न होता जनावरांच्या लहान आतड्याच्या खालच्या भागात पचन होतात (RUDP). जनावरांच्या शरीरासाठी पूर्णतः उपलब्ध होतात यालाच बायपास प्रथिने म्हणतात.

बायपास प्रथिनांचा वापर

१) जनावारांच्या पोटात असणारे सूक्ष्मजीव हे पोटात पचन होणाऱ्या प्रथिनांचे रूपांतर हे सूक्ष्मजीव प्रथिनांमध्ये करतात, परंतु पोटात तयार सूक्ष्मजीव प्रथिने फक्त ४० ते ४५ टक्के अमिनो आम्लाच्या रूपात शोषून घेतले जातात.

२) उत्तम दर्जा आणि अधिक प्रथिने असल्यामुळे संपूर्ण प्रथिनांचे रूपांतर हे सूक्ष्मजीव प्रथिनांमध्ये होत नाही आणि त्याचा काही भाग वाया जातो.

म्हणून अशा पोटाच्या पहिला भागात ६० ते ७० टक्के पचन होणाऱ्या उत्तम दर्जाचे प्रथिने हे विविध कृत्रिम पद्धतीचा वापर करून फक्त २० ते २५ टक्के पचन होण्यास बायपास प्रथिने मदत करतात. या पद्धतीला ‘बायपास प्रथिने’ असे म्हणतात.

३) चाराटंचाईच्या काळात निकृष्ट दर्जाचा चारा वापरला जातो. त्यामुळे जनावराच्या शरीरात पोषणतत्त्वांची कमतरता भासते. त्याचा विपरीत परिणाम दूध उत्पादनावर, तसेच जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. अशा परिस्थितीत प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी बायपास प्रथिनांचा वापर करता येतो.

४) जास्त प्रमाणात जनावरांच्या पोटात पचन होणाऱ्या प्रथिनांचे रूपांतर जनावरांच्या लहान आतड्याच्या खालच्या भागात पचन होण्यामध्ये करण्यासाठी या पद्धतीचा वापर होतो.

बायपास प्रथिने देण्याच्या विविध पद्धती

१) नैसर्गिक प्रथिनांचा उपयोग करणेः पशू आहारात कमी पचन होणारी (मका) प्रथिने मिसळावीत.

२) कृत्रिम अमिनो आम्लेः काही काळ उष्णतेचा समतोल साधून तयार केले जाते. त्यामुळे ते पोटात कमी प्रमाणात पचन होते.

३) पोटामध्ये कृत्रिमरीत्या सोडणे - (बटर, दूध प्रथिने).

बायपास प्रथिने आणि काही महत्त्वाच्या बाबी :

१) बायपास प्रथिने हे जास्त प्रमाणात दूध देणाऱ्या जनावरांसाठी उपयुक्त आहेत.

२) सरासरी १० ते १५ लिटर दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांसाठी नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या (सरकी पेंड, सोयाबीन मिल) बायपास प्रथिनांचा वापर करावा.

३) १५ ते २० लिटर दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांसाठी बाजारात उपलब्ध असलेले नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धतीने बनवलेली बायपास प्रथिने वापरावीत.

४) नैसर्गिक बायपास प्रथिने वापरात असताना पूर्ण आहारातून दिल्या जाणाऱ्या एकूण प्रथिनांच्या ५५ ते ६० टक्के जनावरांच्या पोटात पचन होणारी प्रथिने आणि ४०-४५ टक्के जनावरांच्या लहान आतड्याच्या खालच्या भागात पचन होणारी प्रथिने पाहिजेत.

Milk Busniss
Buffalo Milk Fat : म्हशींची संख्या घटल्यामुळे देशात दुधावरची मलई आटली

बायपास प्रथिनांचे नैसर्गिक स्रोत आणि त्यामध्ये कोठीपोटात पचन न होणाऱ्या प्रथिनांचे प्रमाण -

१) सरकी पेंड : २२ टक्के

२) शेंगदाणा पेंड: ९ टक्के

३) सोयाबीन मिल: १८ टक्के

४) सूर्यफूल पेंड: १३ टक्के

५) मका भुसा : १० टक्के

६) गहू भुसा : ४ टक्के

७) तांदूळ पॉलिश: ५ टक्के

बायपास प्रथिनांचे फायदे :

१) खाद्य घटकातील बायपास प्रथिनांच्या प्रमाणाच्या आधारावर चांगल्या प्रतीचे उत्कृष्ट पोषक पशुखाद्य बनवता येते. कमी खर्चामध्ये उत्कृष्ट पचनीय प्रथिने उपलब्ध होतात.

२) या पद्धतीमुळे पचनशील प्रथिनांचे अमोनिया (उग्र वासाचा वायू) मध्ये रूपांतर कमी प्रमाणात होते. अमोनिया विषबाधेपासून बचाव होतो.

३) शरीरात अमिनो आम्लाचे प्रमाण वाढते, त्यामुळे जनावरांचे दूध उत्पादन ही वाढते. जनावरे चांगला माज दाखवतात. गाभण राहण्याचे प्रमाण देखील वाढते. वाढ व प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते.

४) जास्त दूध देणाऱ्या जनावरांसाठी बायपास प्रथिने अतिशय उपयुक्त आहेत. कारण त्यांची गरज भागवली जाते.

५) दुधातील फॅट आणि एसएनएफ वाढण्यास मदत होते.

६) बायपास प्रथिनांचा जनावरांच्या आहारामध्ये समावेश केल्याने उच्च उत्पादनक्षम जनावरांकडून अपेक्षित उत्पादन घेणे शक्‍य होते.

७) जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.

८) उन्हाळ्यातील जनावरावरील वाढलेला ताण कमी करण्यास मदत होते.

संपर्क : डॉ. संजय भालेराव, ९०९६३२४०४५ - (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com