स्मार्ट शेतीमुळं कस वाढणार शेतकऱ्यांचं उत्पन्न ?

येत्या काळात रिमोट फार्मिंग (Remote Farming), हायड्रोपॉनिक (Hydroponic), जेनिटिक मॉडिफिकेशन (Genetic Modifications), व्हर्टिकल फार्मिंग (Vertical Farming), ड्रोन तंत्रज्ञान (Drone Technology), एरियल फार्मिंग (Aerial Farming) इत्यादींच्या आधारे शेतीमधील उत्पादन आणि आर्थिक उत्पन्नात वाढ करणे सहजशक्य आहे.
Smart farming the way forward to revolutionise agriculture
Smart farming the way forward to revolutionise agriculture

भारतीय शेती आणि शेतकरी अद्यापही पावसापाण्याचा भरोसा देता येत नाही, पायाभूत सुविधांचा अभाव, कुशल मनुष्यबळाचा अभाव, माती परीक्षण, दर्जेदार बि-बियाण्यांची वानवा अन तंत्रज्ञानाचा अभाव या समस्यांच्या घेऱ्यात अडकले आहेत. त्यांची उपजीविका अथवा उदरनिर्वाह संपूर्णतः शेतीमधून मिळणाऱ्या उत्पादनावरच अवलंबून असतो अन त्यातील बहुतांश जण पारंपरिक पद्धतीनेच शेती करता असतात.        वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ( World Economic Forum ) एका अभ्यासानुसार २०५० अखेरीस जगातील लोकसंख्या १० अब्जावर जाईल, अन या वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज आज आहे त्याहून ६० टक्क्यांनी अधिक असेल. ही गरज भागवायची असेल तर शेतीच्या पद्धतीतही आधुनिकतेचा अंगीकार करावा लागेल. थोडक्यात स्मार्ट फार्मिंग (Smart Farming) करावी लागेल. 

कशी असेल ही स्मार्ट फार्मिंग ?     वाढती धान्य गरज भागवण्यासाठी उत्पादनात वाढ हे एक उद्दिष्ट असेल. किमान जागेत कमाल उत्पादन काढण्यासाठी शेतीच्या नव्या पद्धतीचा, दृष्टीकोनाचा आणि प्रक्रियेचा स्वीकार करायला हवा. ॲग्टेक अर्थातच शेती (Agriculture) आणि तंत्रज्ञान (Technology) यांच्या समन्वयातून उत्पादनवाढीचे उद्दिष्ट गाठता येईल.

धान्य उत्पादन, वाहतुकीच्या सुविधा, प्रक्रिया, आणि धान्याची नासाडी या समस्यांवर मात करता येणे शक्य आहे. त्यासाठी येत्या काळात रिमोट फार्मिंग (Remote Farming), हायड्रोपॉनिक (Hydroponic), जेनिटिक मॉडिफिकेशन (Genetic Modifications), व्हर्टिकल फार्मिंग (Vertical Farming), ड्रोन तंत्रज्ञान (Drone Technology), एरियल फार्मिंग (Aerial Farming) इत्यादींच्या आधारे शेतीमधील उत्पादन आणि आर्थिक उत्पन्नात वाढ करणे सहजशक्य आहे.   

पाण्याचा, जमिनीचा अचूक वापर करत शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत करता येईल. नव्या पद्धतीत शेतकरी शेतात स्मार्ट कॅमेऱ्यांचा (Smart Camera) वापर करू शकतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांवरील संभाव्य किड रोखण्यासाठीच्या फवारण्या अचूकपणे करता येतील. तसेच या तंत्रामुळे रसायनांचा नाहक खर्चही आटोक्यात आणता येणार आहे.  

थर्मल कॅमेऱ्यांमुळे (Thermal Camera) शेतकऱ्यांना तापमानाचा अचूक अंदाज कळेल तसेच पिकांमधील पाण्याचा ताण ओळखता येणे शक्य होणार आहे. याशिवाय स्मार्ट शेती पद्धतीत शेतकरी मुख्य तंत्रज्ञान अधिकाऱ्याचा  सल्ला,त्याचे मार्गदर्शनही घेईल. तंत्रज्ञान अधिकारी, कृषी तंत्रज्ञान संशोधनात गुंतलेल्या संशोधकांचे मार्गदर्शन ,पीक शास्त्रज्ञ, सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ, कृषी अभियंते अशा सर्वांच्या मदतीने भारतीय शेतीचा चेहरामोहरा बदलणं शक्य होणार आहे. 

व्हिडीओ पहा-    पारंपरिक शेतीत पेरणी ते काढणीपर्यंत ४५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. स्मार्ट पद्धतीत हा कालावधी अवघ्या २५ दिवसांवर येतो. आधुनिक शेती पद्धतीत पारंपरिक शेतीच्या तुलनेत ९० टक्के पाण्याची बचत होते.

काढणी-कापणीनंतरच्या व्यवस्थापनामुळे, साठवणुकीच्या सुविधांमुळे नाशवंत माल साठवण्याची कालमर्यादा वाढेल. याखेरीज नाशवंत माल सोडून अन्य मालाची नासाडी टाळता येणार आहे. हा साठवून ठेवलेला माल वर्षभरात कधीही ( शेतकऱ्यांच्या मर्जीनुसार) बाजारात जाऊ शकेल, स्मार्ट शेतकरी (Smart Farmer) बाजारभावाचा अंदाज घेऊनच आपला माल विक्रीसाठी बाजारात दाखल करेल अन्यथा तो साठवून ठेवेल.   

शेतीसाठी सौर ऊर्जेचा वापर होईल, डीह्युमिडिफिकेशन तंत्राने हवेतील आर्द्रतेचे पाण्यात रूपांतरण शक्य होणार आहे. भविष्यातील शेतीच्या तंत्रामुळे संपूर्ण शेतीप्रक्रिया प्रदूषणमुक्त बनेल.

कृषी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि डाटा ॲनलिटीक्स (Data Analytics)अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांना किमान उत्पादन खर्चात जास्तीत जास्त शेतीमालाचे उत्पादन घेता येणे शक्य होणार आहे.  केवळ शेतकरीच नव्हे तर स्मार्ट टेक्निकमुळे शेतीमालाच्या व्यवहार साखळीतील आडते, किरकोळ विक्रेते,निर्यातदार या सगळ्यांनाच लाभ होणार आहे. या स्मार्ट फार्मिंगमुळे (Smart Farming) देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातील शेतीचा वाटा वाढणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com