नाशिक जिल्ह्यात १० महिन्यांत १०६९ जणांना सर्पदंश

 नाशिक जिल्ह्यात १० महिन्यांत १०६९ जणांना सर्पदंश
नाशिक जिल्ह्यात १० महिन्यांत १०६९ जणांना सर्पदंश

नाशिक : पावसाळा तसेच नंतर उकाड्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साप आढळण्याचे तसेच सर्पदंशाचे प्रमाण वाढत असते. परंतु यंदा हे प्रमाण अधिक वाढल्याने पर्यावरण तज्ज्ञांकडून याची मीमांसा केली जात आहे. चालू वर्षी गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यात १०६९ जणांना सर्पदंश झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पैकी उपचारास विलंब तसेच इतर कारणांनी १४ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

हिवाळ्याच्या प्रारंभीच्या महिन्यांमध्ये प्रामुख्याने आक्टोबर हीटमध्ये उकाड्यामुळे साप थंड ठिकाणे तसेच मानवी वस्तीजवळ आढळतात. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते.

चालू वर्षी जून महिन्यात सर्पदंश रुग्णांची २०१ इतकी आहे, तर या महिन्यात ४ जणांचा मृत्यू झाला. मागील वर्षी जूनमध्ये १०१ जणांना दंश झाला होता. तर दोघांचा मृत्यू झाला होता. जुलैमध्ये १४९ तर ऑक्टोबरमध्ये १४० जणांना सर्पदंश झाला होता. या महिन्यात ३ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण खूप मोठे आहे. साप चावण्याचे प्रकार आदिवासी तसेच ग्रामीण भागात अधिक आहे. यासह शहरात प्रामुख्याने नदीकिनारी भागात वा शेतीला खेटून असलेल्या वस्त्या व मळे परिसरात हे प्रमाण जास्त आहे. पावसाळा सुरू होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर बिळामध्ये पाणी साचते.

त्यामुळे भक्ष्य शोधण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जून ते ऑक्टोबर या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. म्हणून या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरून न जाता या आपत्कालीन परिस्थितीची शास्त्रीय माहिती घ्यावी, अशी जनजागृती विविध निसर्ग प्राणिप्रेमी संघटनांतर्फे करण्यात आली आहे.

ही काळजी घ्या प्रामुख्याने घराच्या भिंती, कुंपणाच्या भिंती यांना पडलेली बिळे बुजवावी. घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. खिडक्या, दरवाजे यांना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. गवतातून चालताना पायात बूट असावेत. अंधारातून जाताना नेहमी बॅटरी सोबत ठेवावी अशी काळजी घेण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com