Soyabean price: अमेरिकेचे सोयाबीन का खातेय भाव?

अमेरिकेची सायोबीन लागवड सुरु व्हायची आहे. त्याआधीच अमेरिकेच्या सोयाबीनला मागणी वाढली. ब्राझील आणि अर्जेंटीनात उत्पादन घटल्याने सोयाबीनसाठी आयातदार देशांनी आपला मोर्चा अमेरिकेकडे वळविला.
soybean
soybean

पुणेः सोयाबीन बाजारातील बदल कायम आहेत. देशातील बाजारांत सोयाबीन (Soybean) आवक दरासोबत बदलत आहे. तिकडे अमेरिकेत (America) येणाऱ्या हंगामासाठी वायदे (contracts) जोमात सुरु आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या सोयाबीनचे दर वाढले आहेत. मात्र ब्राझीलमधील (Brazil) शेतकरी वायद्यांकडे पाठ फिरवत आहेत. 

अमेरिकेची सायोबीन लागवड सुरु व्हायची आहे. त्याआधीच अमेरिकेच्या सोयाबीनला मागणी वाढली. ब्राझील आणि अर्जेंटीनात उत्पादन घटल्याने सोयाबीनसाठी आयातदार देशांनी आपला मोर्चा अमेरिकेकडे वळविला. परिणामी अमेरिकेच्या सोयाबीनला मागणी आली. त्यामुळे सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळत आहे. ब्राझीलमध्ये यंदा मागील वर्षिच्या तुलनेत १५३ लाख टन सोयाबीन उत्पादन कमी होणार आहे. त्यातच अर्जेंटीनाचे सोयाबीनही यंदा घटले. त्यामुळे चीनसह इतर देशांनी अमेरिकेकडून खरेदी केली. त्यामुळे सीबाॅटवर सोयाबीनचे दर १६ डाॅलरच्याही पुढे गेले. शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १६.६६ डाॅलर प्रतिबुशेल्सने झाले. अमेरिकेत सध्या मागील हंगामातील सोयाबीनची विक्री सुरु आहे. येथे पुढील काही दिवसांत पेरणी सुरु होईल. मात्र आत्तापासून सोयाबीन खरेदीचे व्यवहार सुरु आहेत. त्यामुले पुढील वर्षातही अमेरिकेचे सोयाबीन बाजारात भाव खाण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. हे ही वाचाः युरिया उत्पादन वाढीसाठी सरकारचा पुढाकार

जगातील आघाडीच्या सोयाबीन उत्पादक ब्राझीलमध्ये पिकाची काढणी जोमात आहे. येथील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यात आत्तापर्यंत ६१ टक्के सोयाबीन काढणी झाली. मात्र मागील हंगामाच्या तुलनेत हा आकडा १४ टक्क्यांनी कमी आहे. मागील वर्षी येथे याच काळात ७५ टक्के सोयाबीन काढणी पूर्ण झाली होती. येथील शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत १६ टक्के सोयाबीन विक्रीचे करार केले आहेत. तर मागील वर्षी याच काळात २३ टक्के करार पार पडले होते. मात्र येथील शेतकरी अमेरिकेप्रमाणे पुढील हंगामातील विक्री करार करताना दिसत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे कृषी निविष्ठांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ. खतांचे दर प्रचंड वाढले. त्यामुळे पुढील हंगामात काय स्थिती राहिल, हे स्पष्ट नाही. शेतकरी सोयाबीन पेरू शकतील का? हा ही मुद्दा उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे शेतकरी मागणी असूनही पुढील हंगामातील सोयाबीन विक्रीचे करार करताना हात आखडता घेत आहेत.   

देशातील सोयाबीन बाजारातील बदल कायम आहे. बाजारात मागणी वाढली की दर वाढत आहेत, आणि दर वाढले की आवक वाढते. मात्र एका विशिष्ट पातळीनंतर दरांत काहीशी नरमाई येते. त्यानंतर लगेच बाजारातील आवकही कमी होते. हे सत्र मागील महिनाभरापासून सुरु आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली. हे ही वाचाः हमीभावाने तूर खरेदीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद शनिवारी देशभरातील बाजारांत सोयाबीनला ६ हजार ८०० ते ७ हजार ६०० रुपये दर मिळाला. तर प्लांट्सचे दर ७ हजार ३०० ते ७ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान होते. महाराष्ट्र आणि मध्य प्रेदशात अनेक बाजारांत या दरम्यानच दर होते. बाजारातील बदलत्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com