आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमधील तेजी टिकून

शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड अर्थात सीबाॅटवर सोयाबीन दर तेजीत आहेत. मंगळवारी मार्चचे वायदे १५८४ सेंट प्रतिबुशेल्सवर पोचले होते.
soybean
soybean

पुणे - अमेरिकेच्या सोयाबीनला (soybean) चीनकडून मागणी वाढत आहे. तर ब्राझील, अर्जेंटीना, पेरुग्वे आणि उरुग्वे या देशांमध्ये उत्पादन घटीचा अंदाज आहे. त्यामुळे भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन अनेक मोठ्या कंपन्या सोयाबीनमध्ये पैसा गुंतवत आहेत. स्पेक्यूलेटर्सही बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचं जाणकारांचं मत आहे. तसेच चीनची सोयाबीन खरेदीही सूरुच आहे. यामुळे शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड अर्थात सीबाॅटवर सोयाबीन दर ( soybean rate) तेजीत आहेत. मंगळवारी मार्चचे वायदे १५८४ सेंट प्रतिबुशेल्सवर पोचले होते. 

ब्राझील, अर्जेंटीना, पेरुग्वे आणि उरुग्वे या देशांमध्ये उष्ण आणि दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे या देशांतील  सोयाबीन उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अर्जेंटीना आणि ब्राझीलमध्ये तर दर आठवड्याला उत्पादनातील घटीचे अंदाज व्यक्त होत आहेत. ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादनाचा सरकारी अंदाज १ हजार ३०० लाख टनांवरही येऊ शकतो, अशी शक्यता येथील काही कमोडिटी एक्सर्ट्सनी व्यक्त केली आहे. रिओ ग्रॅंडे डो सूल हे ब्राझीलमधील महत्वाचे सोयाबीन उत्पादक राज्य आहे. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनापैकी तब्बल १८ टक्के उत्पादन या राज्यात होते. परंतु या राज्यातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. मागील महिन्यातील अहवालात युएसडीएने ब्राझीलमध्ये १ हजार ३५० लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. तर येथील संस्थांनी १ हजार २८० ते १ हजार ३३० लाख टनांपर्यंत उत्पादनाचे अंदाज जाहिर केले आहेत.

हे ही वाचा - ' किसान संपदा' योजनेत २०२६ पर्यंत वाढ; योजनेंतर्गत ४६०० कोटी वाटप ब्राझील, अर्जेंटीना, पेरुग्वे आणि उरुग्वे या देशांमधील उत्पादन घटीचा अंदाजामुळे चीनला अमेरिकेकडे वळावे लागत आहे. चीनची सोयाबीनची मागणी मोठी आहे. तसेच यंदा चीनमध्येही उत्पादन घट झाली आहे. चीनला सोयापेंड आणि सोयाबीन तेलाची मोठी आवश्यकता असते. त्यामुळे चीनने भविष्यातील उत्पादन घट लक्षात घेऊन आतापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन खरेदी सुरु केली आहे. या सर्व परिस्थितीमुळे अमेरिकेत सोयाबीन खरेदी अनेक कंपन्या निधी टाकत आहेत. भविष्यात ब्राझील आणि अर्जेंटीना या देशांत सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाल्यास दर वाढतील, या अपेक्षेने अमेरिकेचा सोयाबीन बाजार तेजीत आहे. स्पेक्यूलेटर्स सक्रिय झाले असून सोयाबीन खरेदी करत आहेत.  तसेच सीबाॅटवरील वायद्यांमधील खरेदीही वाढत आहे, असे येथील काही संस्थांनी सांगितले.  

व्हिडीओ पाहा -

सीबाॅटच्या वायद्यांत एक फेब्रुवारीपर्यंतच्या आठवड्यात ९ टक्क्यांनी सुधारणा झाली होती. तर मागील तीन दिवसांत दरात ३ टक्क्यांपर्यंत दर वाढले आहेत. तसेच खाद्यतेलातील तेजीमुळे सोयाबीन वायद्यांत ५ टक्क्यांपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली. मंगळवारी सीबाॅटवर सोयाबीनचे मार्चचे वायदे १५८४ सेंट प्रतिबुशेल्सनी झाले. सोयाबीन दर केवळ सीबाॅटवरच तेजीत नाही चीनच्या वायद्यांमध्येही भाव खात आहे. चीनच्या दलियन कमोडिटी एक्सचेंजवर सोयाबीन आणि सोयापेंडच्या वाद्यांत जवळपास ८ टक्क्यांची सुधारणा झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com