Soybean price: ब्राझीलचे सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी राहणार

ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमी राहणार आहे. तर अर्जेंटीनाने सोयातेल आणि सोयापेंड निर्यातीवर शुल्क लावण्याचा निर्णय घेतला.
soybean
soybean

कोकणात उष्णतेच्या लाटेचा (heat wave) इशारा आहे. तर युध्दामुळे जगात गहू, धान्य, खाद्यतेल, कडधान्याची टंचाई (food grain scarcity) जाणवत आहे. इंडोनेशिया ५० टक्के पामतेल (palm oil) वापर देशातच करणार आहे. वाढत्या उष्णतेचा हापूसला बसतोय फटका बसत आहे. ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन (Soybean production) यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमी राहणार आहे. तर अर्जेंटीनाने सोयातेल आणि सोयापेंड निर्यातीवर शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. पाहू सविस्तर बातम्या. 

1. राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसानंतर उन्हाचा चटका वाढू लागला आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या राज्याच्या कमाल तापमानात वाढ होणार असून, कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. बुधवारपर्यंत कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होणार आहे. काही ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कोकणासह, गुजरात, पश्चिम राजस्थान, कर्नाटक किनारपट्टीच्या भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे ही वाचाः Soybean price: सोयाबीन दरात का होतेय सुधारणा

2. युध्दामुळं जागतिक बाजार विस्कळीत झाला. अन्नधान्य टंचाई जावणत आहे. त्यामुळे अधिक भाववाढ झाली. त्यामुळे अनेक देश आता अन्नधान्य निर्यातीवर बंदी घालत आहेत. परिणामी जागतिक बाजारात गहू, खाद्यतेल, धान्य, कडधान्याची टंचाई अधिक तीव्र झाली. शेतीमाल निर्यातीत युक्रेनची महत्वाची भुमिका आहे. परंतु येथील परिस्थिती एव्हढी बिकट झाली की शेतकरी शेतात जावू शकत नाहीत. त्यामुळे पीक शेतातच उभे आहे. पीक काढणीअभावी वाया गेले. त्यामुळे आज युध्द थांबले तरी युक्रेनची निर्यात सुरु होण्यास किमान एक वर्ष लागेल, असं जाणकारांंनी सांगितलं. त्यामुळे गहू, खाद्यतेल, धान्य, कडधान्याची टंचाई पुढील एक वर्ष तरी कायम राहण्याचा अंदाज आहे.  

3. इंडोनेशिया पामतेल उत्पादनात अग्रेसर आहे. येथे जवळपास ६० टक्के उत्पादन होते. युद्धामुळे पामतेलाचे दर विक्रमी पातळीवर पोचले. याचा फटका इंडोनेशियातील खाद्यतेल आणि बायोडिझेल उद्योगालाही बसतोय. त्यामुळे इंडोनेशिया पामतेल निर्यात कमी करणार आहे. इंडोनेशियाने ५० टक्के पामतेल देशात विक्री करण्याचा निर्णय घेतला. तसेच वाढत्या दरामुळेही पामतेल निर्यातीवर परिणाम होतोय. इंडोनेशियातून जानेवारीमध्ये जवळपास २२ लाख टन पामतेल निर्यात झाली होती. ती मागील वर्षी याच महिन्यात २५ लाख टनांवर होती. इंडोनेशिया भारताला पामतेलाचा पुरवठा करणार महत्वाचा देश आहे. येथून निर्यात कमी झाल्यास भारतीय बाजारात टंचाई निर्माण होऊ शकते. त्यातच सूर्यफूल तेल उपलब्धता कमी आहे. यामुळे खाद्यतेल उपलब्धतेचा प्रश्न भारतासमोर उभा राहणार आहे, असं जाणकारांनी सांगितलं. हे ही वाचाः आशियासाठी भारत ठरतोय गव्हाचे भांडार

4. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पारा ३६ अंश सेल्सिअसवर पोचला. या वातावरणाचा परिणाम हापूसवर झालाय. आंबा भाजून फळगळ होत आहे. त्यात साका होण्याची भीती व्यक्त केली जातेय. तर बारीक कैरी पिवळी पडून गळून पडत आहे. सध्या उन्हाचा पारा ३६ अंश पार करत आहे. किमान तापमान १७.५ अंशापर्यंत आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात कमाल पारा ३२ अंश आणि किमान १४ अंशापर्यंत होता. चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा उष्मा वाढला आहे. सूर्य आग ओकतोय की काय अशी स्थिती सकाळी ११ वाजल्यानंतर तयार होतेय. ही उष्णतेची लाट उद्यापर्यंत राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

5. जागतिक सोयाबीन बाजार यंदा ब्राझीलच्या उत्पादन अंदाजानुसार चालतोय. हंगामाच्या सुरुवातीला ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज होता. मात्र अर्ध्या देशात दुष्काळ आणि अनेक भागांतील पुराने चित्र पालटलं. दर महिन्याला ब्राझीलच्या उत्पादनाचे अंदाज कमी होत गेले. आता तर मागील हंगामापेक्षाही कमी उत्पादन होण्याचा अंदाजये. सध्या ब्राझीलमधील सोयाबीन काढणी ६० टक्क्यांपर्यंत पोचलीये. मात्र उत्पादकता घटली. येथील कोनाब या सरकारी संस्थेने यंदा सोयाबीन उत्पादन १ हजार २२७ लाख टनांवर स्थिरावणार असल्याचं म्हटलंय. हा अंदाज मागील वर्षीच्या तुलनेत १५३ लाख टनांनी कमी आहे. ब्राझीलबरोबरच सोयाबीन उत्पादनात तिसऱ्या क्रमांवर असलेल्या अर्जेंटीनातही उत्पादन कमी झालं. येथेही गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पादन घटलं. परिणामी येथील सोयातेल उत्पादनही घटण्याचा अंदाज आहे. येथे सोयाबीन टंचाई भासतेय. त्यामुळे अर्जेंटीना सरकारने सोयातेल आणि सोयापेंड निर्यात शुल्कात वाढ केलीये. तसेच निर्यातीसाठीची नोंदणीही थांबविली. मात्र सरकारने अद्याप किती शुल्क लागेल हे स्पष्ट केले नाही. परंतु जाणकारांच्या मते सोयाबीनप्रमाणे शुल्क लागेल. सोयातेल आणि सोयापेंडवरही ३१ ते ३३ टक्के निर्यात शुल्क असू शकते. नवीन शुल्क जाहीर झाल्यानंतर निर्यात सुरु होऊ शकते, असंही जाणकारांनी सांगतिलं. या सर्व परिस्थितीमुळे जागतिक बाजारात तेजी आहे. सध्या अमेरिकेचे सोयाबीनही भाव खातेय. खाद्यतेल टंचाईचाही लाभ सोयाबीन दराला होतोय. सोयाबीन बाजार सध्या तेजीत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com