सोयाबीन दरात सुधारणा; खाद्यतेल महागले

बुर्सा मलेशिया एक्सचेंवर कच्च्या पामतेलाचे वायद्यांनी विक्रमी ९ हजार रिंगीटवर पोचले होते. कच्च्या पामतेलाचे मार्चचे वायदे ८ हजार ७२० रिंगीटने झाले. तर मे महिन्यातील वायदे ६ हजार ६५८ रिंगीटवर पोचले होते. एकूणच काय तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि खाद्यतेल आद्यापही तेजीत आहे.
Untitled design (54).png
Untitled design (54).png

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयातेलाचे वायद्यांत चढ-उतार पाहायला मिळाले. मात्र पाम तेलाचा वायदे बाजार विक्रमी पातळीवर टिकून आहे. याचे थेट पडसाद देशातील सोयाबीन बाजारावर उमटत आहेत, असं जाणकारांनी सांगितलं. देशात खाद्यतेलाचे दर वाढल्याने सोयाबीन दरही सुधाले आहेत. 

बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन(Soybean) दरात चढ-उतार पाहायला मिळाले. सीबाॅटवर मे महिन्याचे वायदे १६८९ सेंट प्रतिबुशेल्सने झाले. एक बुशेल २७.२१ किलोचा असतो. तर मार्चचे वायदे(Futures) १६९३ सेंटवर पोचले. स्पाॅटचे भाव सीबाॅटवर १६७९ सेंटने झाले. सीबाॅटवर सोयाबनचे वायदे काहीसे तुटले होते. तर चीनच्या दलियन एक्सचेंजवर(Dalian Exchange) सोयाबीनचे वायदे ६ हजार आरएमबी प्रतिटनाने झाले. सोयाबीन तेलाचे मार्चचे वायदे ७६.१५ सेंट प्रतिपाऊंडने झाले. मे महिन्याचे वायदे मात्र ७५.५० सेंटवर आले होते. 

बुर्सा मलेशिया एक्सचेंवर कच्च्या पामतेलाचे वायद्यांनी विक्रमी ९ हजार रिंगीटवर पोचले होते. कच्च्या पामतेलाचे मार्चचे वायदे ८ हजार ७२० रिंगीटने झाले. तर मे महिन्यातील वायदे ६ हजार ६५८ रिंगीटवर पोचले होते. एकूणच काय तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि खाद्यतेल आद्यापही तेजीत आहे. याचे पडसाद देशातील खाद्यतेल दरावरही उमटत आहेत. रशिया युक्रेन युध्द सुरु झाल्यानंतर सोयातेल, सूर्यफूल तेल आणि पामतेलाचे दर वाढले आहेत. सोयातेलाच्या किरकोळ विक्री दरात २३ फेब्रुवापासून २ मार्चपर्यंत ६ रुपयांची वाढ झाली होती. तर सूर्यफूल तेलाचे दर जवळपास ८ रुपयांनी वाढले. पामतेलाच्या दरातही तब्बल ८ रुपयांनी वाढ झाली. सरकारने खाद्यतेल कमी करण्यासाठी हरऐक उपाय केला, त्याला काही प्रमाणात यशही आले. मात्र आता युध्दामुळे पुन्हा दरवाढ झाली आहे. ………. खाद्यतेलाचे दर (रुपये प्रतिलिटर) तेल…२३ फेब्रवारी…२ मार्च सोयाबीन…१४८…१५२ सूर्यफूल…१४९…१५९ पाम तेल…१३३…१४१ खाद्यतेल दरवाढीचा देशातील सोयाबीनला फायदा होताना दिसत आहे. देशातील बहुतेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सात हजरांवर गेले आहे. बुधवारी देशात सोयाबीनला सर्वसाधारण ६ हजार ५०० ते ७ हजार ६०० रुपये दर मिळाला. तर प्लांटचे दर ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते.

हे हि पहा :  राज्यातही बहुतेक बाजार समित्यांत सोयाबीनचा सर्वसाधारण दर ७ हजारांवर होता. काही बाजार समित्यांतीत सर्वसाधारण दर ६ हजार ७०० ते ७ हजार ४०० रुपयांपर्यंत मिळाला. सध्या देशातील बाजारांत दर सुधारत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com