Soybean price: सोयाबीन बाजार आठवड्यात स्थिर

देशात सोयाबीन मागणी आहे. परंतु एका दरपातळीनंतर मागणी कमी होत होती. तर दर कमी झाल्यानंतर शेतकरी आवक कमी करत होते. त्यामुळे दर स्थिर होते. मागील आठवड्यात सोयापेंडची मागणीही सामान्य होती. त्यामुळे जास्त दराने सोयाबीन खरेदी कमी होत होती. त्यामुळे सोयाबीन दर कमाल पातळीवरून काहीसे नरमले.
soybean
soybean

पुणेः सोयाबीन दर मागील आठवड्यात एका भावपातळीदरम्यान स्थिर (stable) होते. देशातही सोयाबीन (Soyean) बाजारात मोठे बदल नव्हते. आंतरराष्ट्रीय बाजारातही दर (price) एका पातळीदरम्यान फिरत राहिले. मागील आठवड्यात महाराष्ट्रात सोयाबीनला सर्वसाधारण ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपये दर मिळाला. सोयाबीन बाजार मागील आठवडाभर स्थिर होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन दर एका भावपातळीवर टिकून होते. सीबाॅटवर दर १६३० सेंट ते १६७० सेंटच्या दरम्यान राहिले. सोमवारीही सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे १६६३ सेंट प्रतिबुशेल्सने झाले. मार्चचे वायदे १६८७ सेंटवर होते. तर मे महिन्यातील डिलेव्हरीचे सौदे १६८२ सेंट प्रतिबुशेल्सने झाले. हे ही वाचाः हमीभावाने तूर खरेदीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद आत्तापर्यंत चीनकडून अमेरिकेच्या सोयाबीनची मोठी खरेदी सुरु होती. मात्र आता चीनमधील काही शहरांमध्ये पुन्हा लाॅकडाऊन लागला आहे. याचा परिणाम चीनच्या खरेदीवर होूऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले. यंदा अमेरिकेच्या सोयाबीनचा सर्वात मोठा खरेदीदार चीन ठरला होता. ब्राझीलमध्ये उत्पादन घटल्याने चीनने अमेरिकेच्या सोयाबीनला पसंती दिली होती. मात्र आता चीनमध्येच कोरोनाचा उद्रेक होत आहे. त्यामुळे सोयाबीनचा वापर स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर स्थिरावले, असे जाणकारांनी सांगितले. देशात सोयाबीन मागणी आहे. परंतु एका दरपातळीनंतर मागणी कमी होत होती. तर दर कमी झाल्यानंतर शेतकरी आवक कमी करत होते. त्यामुळे दर स्थिर होते. मागील आठवड्यात सोयापेंडची मागणीही सामान्य होती. त्यामुळे जास्त दराने सोयाबीन खरेदी कमी होत होती. त्यामुळे सोयाबीन दर कमाल पातळीवरून काहीसे नरमले. मागील आठवड्यात महाराष्ट्रात सोयाबीनला सर्वसाधारण ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपये दर मिळाला. तर मध्य प्रदेशात ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयाने सोयाबीन विकले गेले.  राजस्थानमध्ये सोयाबीनचे व्यवहार ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयाने झाले. गेले आठवडाभर या भावपातळीदरम्यान सोयाबीनला सर्वसाधारण दर मिळाला. हे ही वाचाः अमेरिकेचे सोयाबीन का खातेय भाव? गेल्या आठवड्यात बाजारातील सोयाबीन आवकही स्थिर होती. आठवडाभर दैनंदिन आवक ६० ते ७० हजार क्विंटलच्या दरम्यान राहिली. त्यामुळे दरही जास्त नरमले नाहीत. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदी दरही स्थिर होते. आठवड्यात मध्य प्रेदशात प्रक्रिया प्लांट्सचे दर ७ हजार ५०० ते ७ हजार ७०० रुपये होते. महाराष्ट्रात हाच दर ७ हजार ३०० ते ७ हजार ५८० रुपयांवर मिळाला. तर राजस्थानमध्ये ७ हजार ५०० ते ७ हजार ७०० रुपयाने प्लांट्सची सोयाबीन खरेदी झाली. बाजारात सोयाबीन दर एका भावपातळीवर स्थिर आहेत. मात्र बाजारात रोज बदल होताना दिसतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com