सोयाबीन दर सुधारण्याचा अंदाज

जागतिक सोयाबीन उत्पादन यंदा ५ टक्क्यांनी घटल्याचं युएसडीएनं म्हटले. यंदा जागतिक उत्पादन ३ हजार ६३८ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज आहे. तर सोयाबीन गाळप दोन टक्क्यांनी वाढले. यंदा जागतिक सोयाबीन गाळप ३ हजार १५१ लाख टन होईल.
सोयाबीन दर सुधारण्याचा अंदाज

पुणेः जागतिक सोयाबीन उत्पादन घटून वापर वाढल्याचं युएसडीएन म्हटले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर काहीसे सुधारले. याचा परिणाम देशातील बाजारावरही जाणवत आहे. गुरुवारी प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनच्या दरात वाढ केली होती. त्यामुळे बाजारातील दरही वाढू शकतात, असं जाणकारांच मत आहे.

जागतिक सोयाबीन उत्पादन यंदा ५ टक्क्यांनी घटल्याचं युएसडीएनं (USDA)म्हटले. यंदा जागतिक उत्पादन ३ हजार ६३८ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज आहे. तर सोयाबीन गाळप दोन टक्क्यांनी वाढले. यंदा जागतिक सोयाबीन गाळप ३ हजार १५१ लाख टन होईल. तर पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा १२ टक्क्यांनी घटेल, असंही युएसडीएनं आपल्या अहवालात म्हटले. जगात सोयाबीन उत्पादनात ब्राझील(Brazil) आघाडीवर आहे. मात्र यंदा येथे उत्पादन ८ टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. येथील उत्पादन १२७० लाख टनांवर स्थिरावणार आहे. तर अर्जेंटीनात उत्पादन यंदा ६ टक्क्यांनी घटले. यंदा अर्जेंटीनात (Argentina)४३५ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल. तर जागतील सर्वांत मोठा आयातदार चीनमध्ये उत्पादन ६ टक्क्यांनी कमी झाले. येथे यंदा १६४ लाख टन सोयाबीन आले. तर अमेरिकेत यंदा उत्पादन ५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाजये, असं अहवालात म्हटले आहे. एकूणच काय तर जागतिक सोयाबीन उत्पादन वाढीपेक्षा गाळपातील वाढ अधिक आहे. ब्राझील, अर्जेंटीना आणि पेरुग्वे या तीन देशांत यंदा ९५ लाख टन कमी उत्पादन येणार आहे. असे झाल्यास उत्पादन दहा वर्षांतील निच्चांकी पातळीवर असेल. यात ब्राझीलमध्ये ७० लाख टन, अर्जेंटीनात १५ लाख टन आणि पेरुग्वेत १० लाख टनांनी उत्पादन घटणार आहे.

हे हि पाहा :  म्हणजेच यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन घटले. मात्र वापर वाढला. त्यातच मागील हंगामात पाम तेलाचे उत्पादन घटले. त्यातच इंडोनेशियाने पामतेल निर्यात मर्यादीत केली. स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं इंडोनेशिया सरकारनं म्हटले आहे. परिणामी पामतेलाचा पुरवठा कमी झाला. त्यामुळं दर वाढले. तर युध्दामुळं सूर्यफूल तेल पुरवठा थांबला. यामुळे उपलब्ध सोयाबीनला गाळपासाठी मागणी वाढते आहे. चीननेही आपली आयात कायम ठेवली. त्यामुळे सोयाबीन दर टिकून आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही दर सुधारत आहेत. सीबाॅटवर मार्चचे सोयाबीनचे वायदे १७०२ सेंट प्रतिबुशेल्सने झाले. तर मे महिन्यातील डिलेव्हरीचे सौदे १६८८ सेंटने पार पडले. स्पाॅट रेट १६४७ सेंटवर होता. ………… आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातील बाजारांतही सोयाबनच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. गुरुवारी सायंकाळपर्यंत प्लाट्सचे दर ८ हजार रुपयांपर्यंत पोचले होते. त्यामुळे बाजार दरात १०० ते २०० रुपयांची सुधारणा होण्याची शक्यता आहे, असं लातूर येथील अशोक अगरवाल यांनी सांगितले. …………. गुरुवारी देशभरात सोयाबीनला ६ हजार ५०० ते ७ हजार ७०० रुपये दर मिळाला. राज्यातील सर्वसाधारण दर ७ हजार ३०० रुपयांवर होता. तर मध्य प्रदेशात सोयाबीन सर्वसाधारण ७ हजार ४०० रुपयाने विकले गेले. राजस्थानमध्ये ७ हजार २०० रुपयाने सोयाबीनचे व्यवहार झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. सोयाबीनला उठाव मिळत असल्यानं दर वाढत आहेत. दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असं जाणकारांनी सांगितलं. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन विक्री करावी, असं आवाहनही जाणकारांनी केलं आहे. 

………… प्रतिक्रिया

गाळपासाठी सोयाबीनला मागणी वाढत आहे. त्यामुळे दरात सुधारणा होत आहे. गुरुवारी प्रक्रिया प्लांट्सनी दरात वाढ केली. काही प्लांट्सचे दर ८ हजारांवर पोचले. त्यामुळे बाजार समित्यांतील दरही १०० ते २०० रुपयांपर्यंत सुधारु शकतात. - अशोक अगरवाल, सोयाबीन व्यापारी, लातूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com