ब्राझील, अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन घटणारः युएसडीए

युएसडीने यापुर्वीच्या अंदाजात ब्राझीलमध्ये १ हजार ३९० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र फेब्रुवारीच्या अहवालात येथील सोयाबीन उत्पादन १ हजार ३४० लाख टनांवर पोचेल असे म्हटले आहे. असे झाल्यास हे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत खुपच कमी राहील.
soybean production
soybean production

पुणेः अमेरिकेच्या कृषी विभागाने ( USDA )  दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटीना आणि पेरुग्वे या देशांमधील सोयाबीन उत्पादनाच्या (soybean production) अंदाजात मोठी घट केली आहे. याचे पडसाद लगेच सोयाबीन बाजावर (soybean market) उमटले. अमेरिका आणि चीनच्या वायदे बाजारांत सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली. सोयापेंड आणि सोयातेलाचेही दर सुधारले.

युएसडीने यापुर्वीच्या अंदाजात ब्राझीलमध्ये १ हजार ३९० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र फेब्रुवारीच्या अहवालात येथील सोयाबीन उत्पादन १ हजार ३४० लाख टनांवर पोचेल असे म्हटले आहे. असे झाल्यास हे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत खुपच कमी राहील. मात्र येथील काही व्यापारी संस्थांच्या मते सोयाबीन उत्पादन यापेक्षाही कमी असेल. अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाजही ४६५ लाख टनांवरून ४५० लाख टनांपर्यंत कमी करण्यात आला आहे. अर्जेंटीनात मागील हंगामात ४६२ लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते. म्हणजेच यंदा अर्जेंटीनात गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी उत्पादन राहील. दक्षिणेतील पेरुग्वे देशातील सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजात कपात करण्यात आली आहे. युुएसडीएच्या मते पेरुग्वे देशातील सोयाबीन उत्पादन ६३ लाख टनांवर स्थिरावेल. मागील हंगामात येथे ९९ लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते.

युएसडीएने (USDA) अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाचा १ हजार २०७ लाख टनांवर कायम ठेवला आहे. मागील हंगामात अमेरिकेत १ हजार १४७ टन सोयाबीन उत्पादन झाले होते. याचाच अर्थ असा की यंदा अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनात वाढ होणार आहे. आधीच ब्राझील, अर्जेंटीना आणि पेरुग्वे या देशांत सोयाबीन उत्पादन घटीच्या अंदाजाने आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर (International soybean market)  तेजीत होते. आता युएसडीएनेही याला पुष्टी दिल्याने बाजारावर लगेच परिणाम जाणवला.महत्वाच्या सोयाबीन उत्पादक देशांत उत्पादन घटीचा अंदाज युएसडीएने व्यक्त केल्यामुळे आंतरराष्ट्रीय सोयाबीन मजबुत स्थितीत आहे. सोयापेंड आणि सोयातेलाचा (soybean oil) बाजारही सुधारला आहे. त्यामुळे याचा आधार देशातील सोयाबीन बाजारालाही होईल. देशातील सोयाबीन दर स्थिर राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

व्हिडीओ पाहा -

बाजारावर परिणाम अमेरिकेच्या वायदे बाजारात गुरुवारी सोयाबीनचा दर विक्रमी १६२३ सेंट प्रतिबुशेल्सवर पोचला होता. तर शुक्रवारी बाजार १५७४ सेंटवर बंद झाला. मार्चचे वायदे १५८४ सेंट प्रतिबुशेल्सनी झाले. सोयापेंडचे व्यवहार ४५५.७ डाॅलर प्रतिटनाने झाले. अमेरिकेच्या वायदे बाजारासह चीनच्या बाजारातही सोयाबीनच्या वायद्यांत सुधारणा झाली. चीनमध्ये सोयाबीनचे मार्चचे वायदे ६ हजार २९७ चीनी युआन प्रतिटनाने झाले. तर सोयापेंडचे व्यवहार ४ हजार ४ युआन प्रतिटनाने झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com