हा हुकुमशाहीविरोधातील संघर्ष: बायडेन

युरोपमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या लष्कराचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज तोंडभरून कौतुक केले. सध्या लोकशाहीचा हुकुमशाहीविरोधात संघर्ष सुरू असून जगाचे स्वातंत्र्य धोक्यात असल्याचे मत त्यांनी मांडले.
This is the struggle against dictatorship: Biden
This is the struggle against dictatorship: Biden

न्यूयॉर्क ः युरोपमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या लष्कराचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज तोंडभरून कौतुक केले. सध्या लोकशाहीचा हुकुमशाहीविरोधात संघर्ष सुरू असून जगाचे स्वातंत्र्य धोक्यात असल्याचे मत त्यांनी मांडले. बायडेन हे सध्या पोलंडच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी येथे तैनात असलेल्या अमेरिकी जवानांशी संवाद साधला. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युरोपच्या पूर्व सीमांवर ‘नाटो’ने सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतल्याने तणाव आणखी वाढला आहे. युक्रेनच्या सीमेला लागून असणाऱ्या रझेसझो हवाई तळाला बायडेन यांनी नुकतीच भेट दिली.

येथे जवानांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘‘ तुम्ही जगातील सर्वोत्तम सैनिक आहात. हा संघर्ष लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असा आहे.’’ साधारपणे फेब्रुवारीपासूनचा कालावधी विचारात घेतला तर अमेरिकेने युरोपमध्ये बारा हजार सैनिक पाठविले आहेत. यातील बराचसा फौजफाटा हा पोलंडमध्ये तैनात असून तिथे तो नाटो सौनिकांच्या पाठीशी उभा राहिला आहे. युरोपीय देशांमध्ये अमेरिकेची काही हवाईतळे असून तेथे देखील नव्याने सैनिकांना तैनात करण्यात आले आहे. दरम्यान बायडेन यांनी देखील येथे आम्ही ‘नाटो’ला पाठिंबा देण्यासाठी आलो असून आम्हाला रशियाशी युद्ध करण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे.

व्हिडिओ पाहा 

युक्रेनच्या मंत्र्यांशी चर्चा

बायडेन यांनी आज पोलंडमध्ये युक्रेनच्या मंत्र्यांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली तसेच संघर्षाचा आढावाही घेतला. रशियाने आक्रमण केल्यानंतर युक्रेनी नेत्यांशी समोरासमोर संवाद साधण्याची बायडेन यांची पहिलीच वेळ होती. या बैठकीमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अॅंटोनी ब्लिंकन आणि संरक्षणंत्री लियॉड ऑस्टिन तसेच युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दमयत्रो कुलेबा आणि संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह देखील सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com