चालू हंगामात साखर निर्यात तीन पटीने वाढली - इस्मा

चालू साखर हंगामातील (२०२१-२२) मजबूत मागणीमुळे भारताची साखर निर्यात २४२ टक्क्यांनी वाढली आहे. हंगामातील ऑक्टोबर ते जानेवारी या पहिल्या चार महिन्यात ३१.५ लाख टन साखरेची निर्यात झाली आहे.
Sugar Export
Sugar Export

चालू साखर हंगामातील (२०२१-२२) मजबूत मागणीमुळे भारताची साखर निर्यात (India's Sugar Export) २४२ टक्क्यांनी वाढली आहे. हंगामातील ऑक्टोबर ते जानेवारी या पहिल्या चार महिन्यात ३१.५ लाख टन साखरेची निर्यात (Sugar Export) झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत निर्यात केवळ ९.२ लाख टन होती, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (Indian Sugar Mills Association) म्हणजेच इस्मा (ISMA) या संस्थेने दिली आहे.  

भारतीय निर्यातदारांनी (Indian Exporter) आतापर्यंत जवळपास ५० लाख टन साखरेच्या निर्यातीचे करार (Sugar Export Agreement) केले आहेत. याशिवाय फेब्रुवारी महिन्यात ८ लाख टनांहून अधिक साखर निर्यात (Export Of Sugar) होणार असल्याची माहिती आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत देशातील साखर उत्पादन ५.६ टक्क्यांनी वाढून २२०.९१ लाख टन झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधित २०९.११ लाख टन इतके होते. चालू साखर हंगामात (Current Crushing Season) देशात ५१६ साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले होते. यापैकी १३ कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. मागील हंगामात याच कालवधित ४९६ कारखान्यांपैकी ३२ कारखान्यांनी आज तारखेपर्यंत गाळप थांबवले होते, असे इस्माने सांगितले आहे.       साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी - महाराष्ट्रात (Maharashtra Sugar) १५ फेब्रुवारीपर्यंत ८६.१५ लाख टन साखर उत्पादन (Sugar Production) झाले आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत ७५.४६ लाख टनांच्या तुलनेत यंदा उत्पादन १४ टक्क्यांनी वाढले आहे. तर दुसरीकडे साखर उत्पादनात महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन ६५,१३ लाख टन झाले असून उत्पादनात ९ टक्क्यांची घट आहे. मागील वर्षी याच कालवधित ५९.३२ लाख टन साखर उत्पादन झाले होते.  

हेही वाचा - देशात विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज मागील वर्षाच्या तुलनेत कर्नाटकात साखर उत्पादनात १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या ३९.०७ लाख टनांच्या तुलनेत फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ४४.८५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. तसेच गुजरातमध्ये ६.९१ लाख टन तर तामिळनाडूत ३.६० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि ओडिशा या राज्यांनी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत एकत्रितपणे २०.८ लाख टन उत्पादन केले आहे. इथेनॉलच्या (Ethanol) बाबतीत बोलताना इस्माने सांगितले की, चौथ्या सायकलमध्ये तेल विपणन कंपन्यांच्या (Oil Marketing Company's) ९५ कोटी लिटर गरजेपैकी सुमारे ३९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा (Suplly Of Ethanol) पुरवठादारांनी केला आहे. तेल विपणन कंपन्या सध्या लिलावासाठी आलेल्या निविदांची छाननी करत असून लवकरच हे काम पूर्णत्वास जाईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com