sugar stocks may sustain rally | Agrowon

सरकारी धोरणामुळे साखर उद्योग क्षेत्राला दिलासा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जानेवारी 2022

यंदाच्या हंगामात साखरेसोबत इथेनॉल मिश्रणामुळेही कारखान्यांना लाभ होतोय. गेल्या हंगामातील इथेनॉलचा विक्रीतून कारखान्यांना चांगला महसूल मिळाला असल्याची प्रतिक्रिया एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन विभागाचे प्रमुख एस. रंगराजन यांनी व्यक्त केलीय.  

केंद्र सरकारच्या अनुकूल धोरणामुळे साखर उद्योग क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून साखर उदयोग क्षेत्रात सकारात्मक वातावरण आहे. इथेनॉल मिश्रणाच्या अभियानासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणारे प्रोत्साहन आणि पथ्थ्यावर पडणाऱ्या आयात धोरणामुळे या क्षेत्रात सध्या समाधानकारक अवस्था आहे. 

गेल्या दोन आठवड्यांपासून इआयडी पॅरी आणि त्रिवेणी इंजिनियरिंग या कंपन्या २० टक्के नफ्यात राहिल्या आहेत. तर दालमिया भारत शुगर १५ टक्के नफ्यात आहे.  द्वारिकेश शुगरला ३४ टक्के नफा, अवध शुगरला ३७ टक्के आणि उत्तम शुगरला २७ टक्के नफा झालाय. साखर उत्पादनात देशात तिसऱ्या स्थानी असलेल्या कर्नाटकातही इथेनॉल मिश्रणाच्या अभियानात सहभागी होण्याची तयारी केलीय.

यंदाच्या हंगामात साखरेसोबत इथेनॉल मिश्रणामुळेही कारखान्यांना लाभ होतोय. गेल्या हंगामातील इथेनॉलचा विक्रीतून कारखान्यांना चांगला महसूल मिळाला असल्याची प्रतिक्रिया एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन विभागाचे प्रमुख एस. रंगराजन यांनी व्यक्त केलीय.    

केंद्र सरकारच्या साखर उद्योग क्षेत्राला दिलासा देणाऱ्या या धोरणामुळे साखर कारखान्यांना आपल्या जमाखर्चाचा ताळमेळ बसवणे शक्य झाले आहे याखेरीज शेतकऱ्यांची थकबाकी वेळेवर जमा करणे शक्य झाले आहे.  २०२० च्या वित्तीय वाटचालीतही साखर उद्योगाला असाच दिलासा मिळत राहील, असा आशावाद 
रंजराजन यांनी व्यक्त केलाय. 

हेही वाचा - आश्वासनपूर्तीसाठी केंद्र सरकारला १५ दिवसांचा अल्टीमेटम 

चालू विपणन वर्षात (डिसेंबर ते नोव्हेंबर) तेल विपणन कंपन्यांनी ३६९ अब्ज लिटर इथेनॉल खरेदीचे करार केलेले आहेत. दरम्यान अंतर्गत आणि जागतिक  बाजारपेठेतील साखरेचे दरही स्थिर असून देशात डिसेंबर अखेरीस ११.६ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.    

सरकारकडून किमान आधारभूत मूल्य (MSP), बफर स्टॉक, उत्पादन साहाय्य आणि विपणन व वाहतूक योजनांतर्गत दिले जाणारे अनुदान अशा अनुकूल  धोरणामुळे साखर उद्योग क्षेत्रात यंदा तेजीचे वातावरण आहे. उत्तम व्यवस्थापन असलेल्या कारखान्यांनी या अनुकूलतेत चांगलच आर्थिक लाभ करून घेतला असल्याची प्रतिक्रिया जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसचे विश्लेषक अचल लोहाडे यांनी व्यक्त केली आहे.   

पेट्रोल आणि अल्कोहोल आयातीवरील खर्चाच विचार करता केंद्र सरकार सध्या साखरेचे अतिरिक्त उत्पादन इथेनॉलनिर्मितीकडे वळवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करून कार्बन उत्सर्जनात घट आणण्यासाठी सरकारचे हे विशेष प्रयत्न सुरु असल्याचेही लोहाडे यांनी नमूद केले आहे. 
 

 


इतर बातम्या
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...