उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक दुहेरी संकटात

अवकाळी पावसानेशेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यात सरकारने इंधनासाठीचे अनुदान (diesel subsidy)बंद केले आहे. या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इंधनासाठीचे अनुदान आणि नवीन बियाण्यांसाठी कर्ज हवे आहे.
Sugarcane-Farmer UP
Sugarcane-Farmer UP

उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील ३ लाखांहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी (Sugarcane Farmers)  सध्या अनेक दुहेरी संकटात सापडले आहेत. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यात सरकारने इंधनासाठीचे अनुदान (diesel subsidy) बंद केले आहे. या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इंधनासाठीचे अनुदान आणि नवीन बियाण्यांसाठी कर्ज हवे आहे.     उत्तर प्रदेशात उद्या (३ मार्च) सहाव्या टप्यासाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर या दहा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Sugarcane Farmers) आपल्या व्यथा मांडल्या आहेत.  

अवकाळी पावसामुळे कुशीनगर जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे या शेतकऱ्यांना यापूर्वी किसान क्रेडीट कार्डावर (KCC) घेतलेल्या कर्जाची परतफेड करता आलेली नाही. त्यामुळे या योजनेत त्यांना नव्याने कर्ज मिळू शकत नाही. या योजनेत किसान क्रेडिट कार्डधारक शेतकऱ्यांना कमी व्याज दरात कर्ज दिल्या जाते. 

गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही पिकांचे नुकसान झाले. आता आम्हाला बियाणे (Seeds) खरेदी करण्यासाठी कर्ज हवे आहे. बियाण्यांसाठी अनुदान नको आहे. सध्या उसाचे बेणे ३५० रुपये प्रति क्विंटल उपलब्ध आहे. त्यासाठी कर्जाची व्यवस्था करण्यात यावी. खतांच्या किमती प्रचंड वाढल्या असल्याची प्रतिक्रिया दूम्हरी गावातील ऊस उत्पादक राम लाल यांनी व्यक्त केली आहे. 

उत्पादनवाढीचा खर्च वाढल्याने ऊस उत्पादकांना ऊस लागवडीत पूर्वीप्रमाणे विशेष रस वाटत नाही. साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध पूर्व उत्तर प्रदेशात एकही कारखाना नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांना गोरखपूर जिल्ह्यातील पिपराह आणि बस्ती जिल्ह्यातील मुन्द्रेवा येथील कारखान्यावर अवलंबून रहावे लागते. 

साखरेबरोबरच बहुतांशी शेतकरी गेल्या काही वर्षात तत्काळ नफा देणारे पीक म्हणून ओळख असलेल्या केळीचीही (Banana) लागवड करत आहेत.  अवकाळी पावसाने शेतात पाणी साचून केळीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  त्यामुळे ऊसासोबतच केली लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा उत्पादनासाठी उसावरच (Sugarcane) अवलंबून राहावे लागले आहे. 

व्हिडीओ पहा-  

गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पावसामुळे आणि शेतात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी, ऊसाचे नुकसान झालेले आहे. आधीचे कर्ज असल्याने नवे कर्ज मिळत नाही, इंधनासाठीचे अनुदान नाही, खते महागलेली त्यात आता बियाणे घ्यायला शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाहीत, अशा अवस्थेत आम्ही काय करायचे ? असा सवाल बबुईया हरपूर येथील शेतकरी अजय कुमार माल यांनी उपस्थित केला आहे.    

आजमितीस उत्तर प्रदेशातील साखर उद्योग (Sugar Production Industry) ४० हजार कोटींचा आहे. साखर कारखान्यांकडील थकबाकी, खतांच्या आणि कीडनाशकांच्या किमतीत झालेली वाढ या अनेक समस्यांमुळे उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकरी जेरीस आला आहे.  उद्या गोरखपूर, आंबेडकरनगर, बालिया, बलरामपूर, बस्ती, देवरिया कुशीनगर,  संत कबीर नगर, सिद्धार्थ नगर या भागात उद्या (३ मार्च) मतदान करणार आहेत. कुशीनगर जिल्ह्यांतील १६ सर्कलमधील १६२० गावातले मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत.  

२०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत कुशीनगरच्या मतदारांनी भाजपला कौल दिला होता. यात जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचाही समावेश होता. आता त्रस्त झालेले ऊस उत्पादक कोणाला कौल देतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com