दापोडे येथे उसाला शॉर्टसर्किटमुळे आग

वेल्हे (जि. पुणे)तालुक्‍यातील दापोडे येथील दौलत राजाराम शेंडकर यांच्या शेतातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला. बाजूला शेतातच काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठे नुकसान टळले.
दापोडे येथे उसाला शॉर्टसर्किटमुळे आग Sugarcane fire due to short circuit
दापोडे येथे उसाला शॉर्टसर्किटमुळे आग Sugarcane fire due to short circuit

वेल्हे,  जि. पुणे ः तालुक्‍यातील दापोडे येथील दौलत राजाराम शेंडकर यांच्या शेतातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला. बाजूला शेतातच काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठे नुकसान टळले. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले व ठिणगी उसाच्या शेतात पडली. उसाला आग लागली तेव्हा बाजूच्या शेतात शेतकरी काम करीत होते. ताबडतोब शेतकऱ्यांनी उसाला सोडलेले पाणी आग विझविण्यासाठी वापरले. काही वेळातच आग आटोक्‍यात आणण्यात शेतकऱ्यांना यश मिळाले. शेतकरी दौलत शेंडकर म्हणाले की, मागील दोन वर्षांपूर्वी देखील अशीच घटना माझ्या शेतात घडली होती. त्यावेळी देखील माझा ऊस जळाला होता. यावेळी महावितरणकडे लाइन दुरुस्त करण्याची मागणी केली होती. परंतु या मागणीकडे महावितरण दुर्लक्ष केले. वेळीच लाइन दुरुस्त केली असती तर पुन्हा ही घटना घडली नसती. याबाबत महावितरणचे शाखा अभियंता सोनार यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, घटनेच्या ठिकाणी भेट दिली असून येथील परिस्थितीची पाहणी केली व तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com