सूर्यफूल तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता

भारतात दरवर्षी जवळपास २२० ते २२५ लाख टन खाद्यतेलाचा वापर होतो. त्यात सूर्यफूल तेल २५ लाख टनांवर लागते. खाद्यतेल बास्केटमध्ये पाम तेल, सोयातेल आणि मोहरी तेलानंतर सूर्यफूल तेल चौथ्या क्रमांकाव आहे. दरवर्षी २२ ते २५ लाख टन सूर्यफूल तेलाची गरज असते. त्यापैकी देशात केवळ ५० हजार टनांच्या दरम्यान उत्पादन होते. बाकी सूर्यफूल तेल आयात केले जाते.
sunflower oil
sunflower oil

पुणेः भारत सूर्यफूल तेलासाठी पूर्णतः आयातीवर अवलंबून आहे. यात युक्रेनचा वाटा जवळपास ८० टक्के आहे. त्यानंतर रशिया आणि अर्जेंटीनाचा नंबर लागतो.  अर्जेंटीना आणि रशियातूनही भारतात सूर्यफूल तेल आयात (Sunflower oil Import) होते. त्यामुळे रशिया आणि युक्रेन युध्दाचा सूर्यफूल तेल आयातीवर परिणाम होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युध्दाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. कच्च्या तेलाच्या (Crude oil) दराने १०० डाॅलर प्रतिबॅरलचा टप्पा पार केला. याचा परिणाम इतर देशांमध्ये लगेच दिसून येत आहे. भारतात निवडणुकांमुळे इंधनाचे दर गेल्या काही दिवासांपासून स्थिर आहेत. मात्र उत्तर प्रदेशातील मतदानाचा शेवटचा टप्पा ७ मार्चला संपल्यानंतर इंधनाचे दर (Fuel rates) किती वाढतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या युध्दामुळे केवळ पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढून महागाई वाढेल असं नाही, तर खाद्यतेल दराचा (Edible oil rates) फटका बसेल. त्यातच भारत सुर्यफूल तेलासाठी या दोन देशांवरच अवलंबून आहे. त्यामुळे सूर्यफूल तेलाचे दर वाढतील हे नक्की.

भारतात दरवर्षी जवळपास २२० ते २२५ लाख टन खाद्यतेलाचा (Edible oil) वापर होतो. त्यात सूर्यफूल तेल (Sunflower oil)  २५ लाख टनांवर लागते. खाद्यतेल बास्केटमध्ये पाम तेल, सोयातेल आणि मोहरी तेलानंतर सूर्यफूल तेल चौथ्या क्रमांकाव आहे. दरवर्षी २२ ते २५ लाख टन सूर्यफूल तेलाची गरज असते. त्यापैकी देशात केवळ ५० हजार टनांच्या दरम्यान उत्पादन होते. बाकी सूर्यफूल तेल आयात केले जाते. आयातीमध्ये युक्रेन आणि रशियातून येणाऱ्या सूर्यफूल तेलाचा वाटा अधिक आहे.

केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाने दिलेल्या आकडेवरीनुसार २०१९-२० मध्ये २५ लाख टन  सूर्यफूल तेल आयात झाली होती. याचे मूल्य १८९ कोटी डाॅलर होते. यापैकी युक्रेनमधून १९.३ लाख टन म्हणजेच १४७ कोटी डाॅलर किमतीच्या तेलाची आयात झाली. तर रशियातून २.८७ कोटी डाॅलर किमचे ३.८ लाख टन तेल देशात आले. मागील हंगामात युक्रेनमधून १७.४ लाख टन आयात झाली तर रशियातून २.८ लाख सूर्यफूल तेल दाखल झाले.

या दोन देशांबरोबरच अर्जेंटीनातूनही काही प्रमाणात सूर्यफूल तेलाची आयात (Sunflower oil Import)  होते. रशियाने आपले सैन्य सिमांवर तैनात केल्यानंतर युक्रेनने पोर्टवर कामकाज बंद केलंय. यामुळे शेतीमालासह इतर वस्तूंचा व्यापार प्रभावित झाला आहे. रशियाने काळा समुद्र प्रदेशातील आपली बंदरे व्यापारासाठी खुली ठेवली. मात्र जहाज मालकांनी धोका नको म्हणून वाहतूक बंद ठेवलीये. तसेच धोका लक्षात घेऊन विमा कंपन्यांनी प्रिमियमही वाढवला आहे. त्यामुळेही सूर्यफूल तेलाची वाहतूक प्रभावित झाली आहे.

मात्र सूर्यफूल तेलाचे (Sunflower oil) दर रशिया आणि युक्रेन युध्द सुरु होण्याच्या आधीपासूनचे वाढत होते. पाम तेलात तेजी आल्यानंतर सूर्यफूल तेल दरानेही झेप घेतली. मुंबई पोर्टवर सूर्यफूल तेल आयातीचा दर १ हजार ६३० ते १ हजार ६७० डाॅलरपर्यंत वाढला आहे. मागील आठवड्यात हाच जर १ हजार ५००, तर मागील वर्षी १४०० डाॅलरपर्यंत होते. हे दर आणखी किती वाढतील हे सांगता येत नाही,  असंही जाणकारांनी सांगितले.

व्हिडीओ पाहा -

पाम तेल (Palm oil) आणि सोयाबीन, सूर्यफूल तेलातील तफावत कमी झाली आहे. त्यामुळे आयातदार सोयातेल (Soy-oil) आणि सूर्यफूल तेलाला पसंती देत आहेत. मात्र युध्दामुळे सूर्यफूल तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला किंवा दर वाढले, तर आपसुकच सोयातेलाला मागणी वाढेल. परिणामी सोयातेलाचे दर वधारतील. याचा लाभ थेट सोयाबीनला मिळू शकतो, असे जाणकारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com