सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका 

न्यायमूर्ती ए. एम खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सी.टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने एका अधिवेशनापेक्षा जास्त काळ निलंबन सभागृहाच्या अधिकारक्षेत्रात नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे असा निर्णय घेणे असंवैधानिक असून याचिकाकर्ते १२ आमदार या क्षणापासून विधानसभा सदस्य म्हणून असणारे अधिकार बजावू शकतील, असा निर्वाळा खंडपीठाने दिला आहे.
suspension of 12 MLA
suspension of 12 MLA

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याने भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले होते. यानंतर भाजपने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. 

आशिष शेलार, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, डॉ. संजय कुटे, हरीश पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, बंटी भांगडिया, पराग अळवणी या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. यंदा हिवाळी अधिवेशनात त्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी भाजपने केली होती. मात्र, एक वर्षाच्या निलंबनावर सरकार ठाम असल्याचे दिसले. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने भाजपला दिलासा दिला आहे. 

न्यायमूर्ती ए. एम खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सी.टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने एका अधिवेशनापेक्षा जास्त काळ निलंबन सभागृहाच्या अधिकारक्षेत्रात नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे असा निर्णय घेणे असंवैधानिक असून याचिकाकर्ते १२ आमदार या क्षणापासून विधानसभा सदस्य म्हणून असणारे अधिकार बजावू शकतील, असा निर्वाळा खंडपीठाने दिला आहे. न्यायालयाचा हा निर्वाळा ठाकरे सरकारसाठी धक्का मानला जात आहे. येत्या मार्च महिन्यात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून या निर्णयामुळे भाजपच्या १२ आमदारांचा पुन्हा विधानभवनात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. इम्पिरिकल डेटा केंद्राकडून मागविण्याच्या ठरावावेळी सभागृहात गैरवर्तन केले आणि अध्यक्षांच्या दालनात तालिकाध्यक्षांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा ठपका ठेवत या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com