Agro Processing : झटपट खारमुरे, फुटाणे बनविणारे यंत्र

सध्या पोषक आणि झटपट तयार होणाऱ्या आणि त्वरित खाता येतील अशा पदार्थांना वाढती मागणी आहे. यामध्ये पॉपकॉर्न, लाह्या, खारमुरे, फुटाणे यासारख्या पदार्थांना चांगली मागणीआहे.
Agro-processing
Agro-processing Agrowon

सध्या पोषक आणि झटपट तयार होणाऱ्या आणि  त्वरित खाता येतील अशा पदार्थांना वाढती मागणी आहे.

यामध्ये पॉपकॉर्न (Popcorn), लाह्या, खारमुरे, फुटाणे  यासारख्या पदार्थांना चांगली मागणीआहे. मक्याच्या, ज्वारीच्या, बाजरीच्या लाह्या तसच शेंगदाण्याचे खारमुरे, चण्याचे फुटाणे, सोयाबीनचे खारमुरे (Soybean kharmure) म्हणजेच सोयाणे हे पदार्थ त्वरित खाण्यायोग्य आणि पोषक आहेत.

कारण हे पदार्थ पूर्ण धान्यापासून बनवितात याशिवाय या पदार्थांना बाजारात कायम मागणी आहे. हे पदार्थ पारंपारिक पद्धतीन बनविताना जास्त वेळ लागतो.

साधारणपणे भट्टीमध्ये उच्च तापमान आणि कमी वेळ हे तत्व वापरून लाह्या आणि खारमुरे बनवितात.

या पद्धतीने भट्टीवर कढई मध्ये वाळू वापरतात परंतु त्यामुळे लाह्या आणि खारमुरे मध्ये एक प्रकारची कचकच जाणवते. भट्टीमुळे छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता असते. 

Agro-processing
Amla Processing : आवळ्यातील बिया काढण्यासाठी हस्तचलीत यंत्र

पारंपारिक पद्धतीमधील सगळ्या मर्यादा, तोटे लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने विद्युत चलित कढई विकसित केली आहे. या कढईमध्ये वाळू ऐवजी मिठाचा वापर केला आहे.

या कढईमध्ये सर्व बाजूंनी उष्णतारोधकाच आवरण दिलेल आहे. त्यामुळे कढईच तापमान नियंत्रित करता येतं. परिणामी ऊर्जेची बचत होते आणि लाह्या व खारमुरे बनविण्याची प्रक्रिया व्यवस्थित होते.

या विद्युत चलीत कढईमध्ये धान्यानुसार तापमान नियंत्रण करून मक्याच्या, ज्वारीच्या बाजरीच्या लाह्या तसच शेंगदाणे, सोयाबीन खारमुरे, फुटाणे उत्तम रित्या तयार होतात.

एका दिवसाला साधारणपणे ५० किलो धान्यावर प्रक्रिया केल्यास व ५० ग्रॅम, १०० ग्रॅम चे पॉलिथिन पॅकिंग व लेबलींग केल्यास चांगला नफा मिळतो. या विद्युत चलीत कढईची अंदाजे किंमत तीस हजार रुपये आहे. 

Agro-processing
Food Processing : अल्पभूधारक झाला डाळ मिल यंत्र उद्योजक

मोठ्या प्रमाणावर लाह्या आणि खारमुरे, फुटाणे, सोयाणे तयार करायचे असल्यास कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने एलपीजी चलित किंवा विद्युत मोटरचलित यंत्र विकसित केलय.

लाह्या व खारमुरे बनविण्यासाठी या यंत्रामध्ये वाळूऐवजी मिठाचा वापर करता येतो. ज्वारी, बाजरी, मक्याच्या लाह्या तसच सोयाबीन शेंगदाण्याचे खारमुरे, फुटाणे बनविता येतात या यंत्राची क्षमता ३० ते ४५ किलो प्रति तास आहे.

या यंत्रामध्ये धान्याप्रमाणे लागणारे प्रक्रिया तापमान ५०० अंश सेल्सिअस प्रमाणे नियंत्रित करता येत. या यंत्राची किंमत अंदाजे ५.५० लाख रुपये आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com