
Agriculture Mechanization परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ‘पशुशक्तीचा योग्य वापर योजनेअंतर्गत लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारी अनेक कृषी अवजारे (Agriculture Implements) विकसित करण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांकडून या अवजारांना (Agriculture Machinery) मोठी मागणी आहे. ही बाब लक्षात घेऊन ही कृषी अवजारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्साठी परभणी कृषी विद्यापीठ आणि दर्यापूर (जि. अमरावती) येथील दुर्गा अॅग्रो वर्क्स यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
या कराराद्वारे विद्यापीठाने विकसित केलेल्या १४ कृषी अवजारे निर्मितीचा अधिकार दुर्गा अॅग्रो वर्क्स यांना देण्यात आला आहे. सामंजस्य करार कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या अध्यक्षतेत झाला.
संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धीरज कदम, विद्यापीठ नियंत्रक दीपाराणी देवतराज, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, योजनेच्या प्रमुख डॉ. स्मिता सोलंकी, ‘दुर्गा अॅग्रो वर्क्स’चे सूरज चंदेल, विभाग प्रमुख डॉ. राहुल रामटेके, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रवीण कापसे आदी उपस्थित होते.
डॉ. इंद्र मणी म्हणाले, ‘‘परभणी कृषी विद्यापीठाने अनेक कृषी अवजारे संशोधित केली आहेत. त्यांची दर्जेदार निर्मिती करून किफायतशीर दरात शेतकऱ्यांना मिळण्यासाठी हा सामंजस्य करार केला. केवळ कृषी अवजारे संशोधित करून उपयोगाचे नसून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.