शेतजमिनीच्या किंमत निर्देशकांची नोंद घेता येणार

शेतजमिनीची किंमत ठरवताना अनेक अडथळे येतात. यावर उपाय म्हणून शेतजमिनीचे नोंद आणि निरीक्षण करण्यासाठी भारतात पहिल्यांदाच भूमी किंमत निर्देशकं गुरुवारी लॉन्च करण्यात आला.
Land Price Index
Land Price IndexAgrowon

शेतजमिनीची (Agriculture Land) किंमत ठरवताना अनेक अडथळे येतात. यावर उपाय म्हणून शेतजमिनीचे नोंद आणि निरीक्षण करण्यासाठी भारतात पहिल्यांदाच भूमी किंमत निर्देशकं (Land Price Index) गुरुवारी लॉन्च करण्यात आला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-अहमदाबाद (आयआयएम-ए) आणि कृषी-लँड मार्केटप्लेस यांच्या सहकार्याने देशातला पहिला भूमी किंमत निर्देशकं लॉन्च केला आहे. भूमी किंमत निर्देशकांमुळे पहिल्यांदाच भारतातील शेतजमिनीच्या किमतीनुसार नोंदी घेता येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

भूमी किंमत निर्देशकांच्या फायद्याबद्दल बोलताना आयआयएमचे प्रशांत दास म्हणाले, “जमिनीच्या पूर्वीच्या किंमतीबद्दल आणि त्यातल्या अडचणीबद्दल जमीन खरेदी करणारा अधिकृत माहिती घेऊ शकतो. तसेच जमिनीच्या भविष्यातील गुंतवणुकीचाही अंदाज घेता येऊ शकतो.”

भूमी किंमत निर्देशकं ग्रामीण आणि शहरी भागातील जमिनीची किंमत निश्चित करायला मदत करेल, त्यामुळे शेत जमिनीची किंमत ठरवताना त्याला रियल इस्टेटचं स्वरूप देण्यात येईल, अशी माहिती संस्थेमार्फत देण्यात आली आहे. सध्या देशातील सहा राज्यातील नोंदीच्या आधारे या दोनही संस्था काम करत आहेत. त्यामध्ये तामीळनाडू, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, उत्तरप्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

भूमी किंमत निर्देशकांचा वापर करून आर्थिक घटक कसे बदलतात याचाही अभ्यास करता येऊ शकतो, अशी माहिती दास यांनी दिली.

जमिनीच्या किमती निश्चित करणे कठीण काम असते. त्यामुळे अशा जिकरीच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी विशिष्ठ पद्धत वापरली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com