
हरितगृहाची उभारणी ही आधुनिक शेतीकडे नेणारे पाऊल मानले जात असले तरी त्याच्या खर्चिकतेमुळे अनेक लोक त्यापासून दूरच राहणे पसंत करतात. ही बाब प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असली तरी लहान किंवा अत्यल्प जागेमुळे परसबागेत काही रोपे लावू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ती आणखीन अडचणीची ठरते. अशा लहान क्षेत्रावर शेती करू पाहणाऱ्या लोकांसाठी स्मार्ट इनडोअर ग्रीनहाउस बाजारात येत आहे. घरामध्ये किंवा कार्यालयामध्ये एखादे आकर्षक रोप किंवा झाड आपले मन लुभावणारे असते. अशीच एखादी कुंडी आपल्याही घरी, बागेत किंवा गॅलरीत असली पाहिजे, अशी इच्छाही होते. मात्र एखादे रोप लावणे सोपे असले तरी त्याची सातत्यपूर्ण देखभाल करणे अत्यंत अवघड ठरते. पाणी कमी झाले किंवा जास्त झाले, कीड रोग आला अशा कोणत्याही थोड्याशा दुर्लक्ष किंवा चुकीमुळे झाड मरून जाऊ शकते. असे एक दोन अनुभव झाल्यानंतर आपला झाड, रोप लावण्याचा उत्साह कायमचा मावळतो. हे सारे टाळण्यासाठी कंपनीने ‘प्लॅन्टी’ हे घरात उभारण्याजोगे स्मार्ट ग्रीनहाउस विकसित केले आहे. प्लॅन्टी हे रोप वाढीच्या सर्व बाबींची एकत्रित काळजी घेणारे ग्रीनहाउस आहे. त्यांनी विद्युत प्रवाह सुरू करा आणि विसरून जा, इतक्या सोप्या पद्धतीपर्यंत झाडे वाढवण्याचा अनुभव नेला आहे. यात सर्व प्रकारच्या म्हणजेच बोन्साय, गुलाब, ऑर्किड, सूर्यफूल, मिरची, ढोबळी मिरची, गाजर, मायक्रोग्रीन्स किंवा मांसाहारी वनस्पतीही वाढवणे शक्य आहे. या छोट्याशा घरगुती स्मार्ट ग्रीनहाऊस बद्दल माहिती देताना ‘प्लॅन्टी इनोव्हेशन्स’ या कंपनीच्या कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक ओन्ड्रा झ्बायटेक यांनी सांगितले, की मला स्वतःला रोपे लावण्याचा आणि वाढवण्याचा छंद आहे. मात्र कितीही काळजी घेतली तरी कोणत्या कोणत्या कारणामुळे रोप मरून जाई. ही मोठी दुखःद गोष्ट असे. बाजारामध्ये रोपांची काळजी घेण्यासंदर्भात वेगवेगळी संशोधने असली तरी झाडांच्या उगवण, वाढ आणि सर्वंच टप्प्यांवर उपयुक्त ठरेल, नियंत्रण ठेवेल असे एकही साधन उपलब्ध नसल्याचे माझ्या लक्षात आले. एक इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून त्यात एक आव्हान आणि आणि उद्योजक म्हणून संधीही दिसली. त्यातूनच तयार झाले आमचे प्लॅन्टी. प्लॅन्टी हे उत्तम दर्जाच्या पुनर्वापरयोग्य आयोनाइज्ड अॅल्युमिनिअम आणि हार्डन्ड पीएमएमए काचेपासून बनवलेले उपकरण आहे. ते घर किंवा कार्यालयामध्ये ठेवण्यासाठी अत्यंत आकर्षक आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. त्यात झाडासाठी आवश्यक प्रकाश, त्याचे रंग आणि तीव्रता, प्रत्येक झाडानुसार आवश्यक दिवस- रात्रीची योग्य सायकल, मातीची आर्द्रता, हवेचे तापमान, हवेचा प्रवाह अशा अनेक छोट्या मोठ्या बाबींची काळजी घेतली जाते. प्लॅन्टीवर एक डिस्प्ले असून, त्यात रोपांसंबंधी माहिती येत जाते. प्रत्येक रोपांगणिक वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर करावयाची कामे, झाडांचे प्रत्यक्ष तपासणी आवश्यकतेनुसार त्यात करावयाचे बदल हे सातत्याने कळवले जाते. या उपकरणामुळे परसबाग, घर, कार्यालयातील सुशोभीकरणाच्या पद्धती यात आमूलाग्र बदल शक्य होतील, असा दावा कंपनीने केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अनेक ठिकाणी घरातून बाहेर पडण्यावर, बागा, पर्यटन स्थळे यावर अनेक बंधने होती. या काळात घरातच आपली छोटी बाग तरी असावी, हा उद्देश या नव्या उपकरणातून साध्य होईल. असा होता एका कल्पनेचा प्रवास
उपकरणासोबत अन्य उपयुक्त साधने...
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.