डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र

काही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात. फवारणी करतेवेळी या द्रावणांचा संपर्क येऊन आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सौरऊर्जेवर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र विकसित केले आहे.
डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र
Automatic spray machine based on digital technology

काही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात. फवारणी करतेवेळी या द्रावणांचा संपर्क येऊन आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सौरऊर्जेवर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र विकसित केले आहे. अलीकडच्या काळात शेतीकामांसाठी कुशल मजुरांची कमतरता भासत आहे. याचा परिणाम अल्पभूधारक आणि मध्यम भूधारक शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. त्यासाठी शेती कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे विकसित करणे काळाची गरज आहे. कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी पिकांवर योग्य वेळी एकसमान प्रमाणात फवारणी करणे गरजेचे असते. काही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात. त्याचा मानवी आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सौरऊर्जेवर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र विकसित केले आहे. यंत्राची वैशिष्ट्ये 

  • यंत्र पूर्णपणे स्वयंचलित असून सौरऊर्जेवर चालते.
  • यंत्र १२ व्होल्ट क्षमतेच्या बॅटरीवर चालते. बॅटरी चार्ज होण्यासाठी साधारण ३ तास लागतात. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ६ तासांपर्यंत काम करणे शक्य होते.
  • मोबाईल फोनद्वारे यंत्र नियंत्रित करता येते.
  • दीड किमी प्रति तास या वेगाने यंत्र काम करते.
  • यंत्राची रुंदी १.७ मीटर असून एकावेळेस त्याच्या आकाराएवढ्या क्षेत्रावर फवारणी करणे शक्य होते.
  • यंत्राद्वारे एका तासामध्ये साधारण २० ते २२ गुंठे क्षेत्रावर फवारणी करता येते.
  • यंत्रावर ४० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे.
  • यंत्राचे वजन साधारण ११० किलो इतके आहे.
  • फवारणीसाठी यंत्रामध्ये ६ बूम नोझल बसविण्यात आले आहेत.
  • यंत्र एकावेळी ७५ ते ८० किलो इतके वजन उचलू शकते.
  • यंत्रामध्ये ३६० अंशांमध्ये गोल फिरणारे कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे फवारणीसोबतच पिकाचे निरीक्षण करणे शक्य होते.
  • यासोबतच यंत्रावर विविध प्रकारचे आवाज येणारे स्पीकर बसविले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी आणि पक्ष्यांपासून होणारे पिकाचे नुकसान टाळता येते.
  • यंत्राचा उपयोग मूग, उडीद, सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी, करडई, भुईमूग, गहू, मका, बाजरी इत्यादी पिकांमध्ये करता येतो.
  • - शिवानंद शिवपुजे, ९४२१०८५२०२, ९५२७०८७६९४. (राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.