आता स्वतःच करा माती परीक्षण !

कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) माती परीक्षण वेगाने व अचूक करण्यासाठी पोर्टेबल किट विकसित केले आहे. पाच ग्रॅम मातीचा नमुना घेऊन मोबाईलच्या मदतीने फक्त ९० सेकंदांमध्ये मातीचे आरोग्य जाणून घेता येईल.
आता स्वतःच करा माती परीक्षण !
IIT-Kanpur develops portable device for soil testing

कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) माती परीक्षण वेगाने व अचूक करण्यासाठी पोर्टेबल किट विकसित केले आहे. पाच ग्रॅम मातीचा नमुना घेऊन मोबाईलच्या मदतीने फक्त ९० सेकंदांमध्ये मातीचे आरोग्य जाणून घेता येईल.   सध्या माती परीक्षणासाठी मातीचा साधारणपणे १ किलो नमुना शहर किंवा जवळपासच्या गावामध्ये असलेल्या प्रयोगशाळेमध्ये नेऊन द्यावा लागतो. त्यात अपेक्षित घटकानुसार त्याचे निष्कर्ष मिळण्यासाठी दोन ते सात दिवस लागू शकतात. यामध्ये शेतकऱ्यांना वाहतुकीचा त्रास, वेळ आणि पैसा खर्च होतो. या त्रासामुळे बहुसंख्य शेतकरी माती परीक्षणापासून करण्यापासून वंचित राहतात. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी आयआयटी कानपूर येथील संस्थेच्या रसायन अभियांत्रिकी विभागातील प्रो. जयंत कुमार सिंग, पल्लव प्रिन्स, अशर अहमद, यशस्वी खेमानी आणि महम्मद आमीर खान यांनी हे उपकरण बनवले आहे. हे उपकरण ‘नीअर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमेट्री’ तंत्रज्ञानावर आधारित आहे. याचे एक किट तयार केले असून, परीक्षणाचा निष्कर्ष त्वरित मोबाईलवर प्राप्त होण्यासाठी ‘भू परीक्षक’ हे मोबाईल ॲप तयार केले. (गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध.) या तंत्रज्ञानाचे हस्तांतर संस्थेने ॲग्रोएनएक्सटी सर्व्हिसेस या कंपनीला केले असून, लवकरच बाजारात उपलब्ध होईल.  असे होते परीक्षण

 • केवळ पाच ग्रॅम माती नमुना पाच सेंमी लांबीच्या परीक्षानळीसारख्या दिसणाऱ्या उपकरणामध्ये टाकायचा. त्यानंतर हे उपकरण ब्ल्यूटूथद्वारे मोबाईलशी जोडायचे. जर ब्ल्यूटूथ चालू असेल, तर ते आपोआप जोडले जाते. विश्‍लेषणाची प्रक्रिया ९० सेकंदांमध्ये पार पडते. त्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनवर भू-परीक्षक या विशेष तयार केलेल्या ॲपमध्ये मातीच्या आरोग्याचा अहवाल एकमेव अशा आयडी क्रमांकासह त्वरित उपलब्ध होतो.  
 • या उपकरणामुळे मातीतील नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय कर्ब यांसह सहा घटकांचे प्रमाण समजू शकते. 
 • पिकाचा उल्लेख केलेला असल्यास त्या पिकासाठी शिफारशीत खतमात्रा आणि परीक्षणानुसार करायचे बदल यानुसार आपल्या शेतासाठीच्या खत शिफारशी सुचविल्या जातात. त्यानुसार पिकांचे खत व्यवस्थापन केल्यास पिकाचे उत्पादन वाढीसाठी फायदा होऊ शकतो. 
 • तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये

 • आकाराने लहान, वायर लेस, कोठेही नेण्याजोगे तंत्रज्ञान.
 • केवळ ९० सेकंदांमध्ये मातीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण समजू शकते.
 • एक उपकरणाद्वारे एक लाखापर्यंत माती नमुने तपासता येतात. ही क्षमता अन्य माती परीक्षण कीटच्या तुलनेमध्ये सर्वाधिक असल्याचा दावा संस्थेने केला आहे.
 • हे उपकरण आणि मोबाईल ॲप्लिकेशनही अत्यंत सोपे व इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या किंवा मोबाईल व्यवस्थित वापरू शकणाऱ्या कुणालाही वापरता येऊ शकते.
 • शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात पीक उत्पादनातील अत्यंत महत्त्वाची बाब असलेल्या माती परीक्षणाची सोयही जवळ उपलब्ध असेलच असे नाही. संस्थेतील शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या उपकरणामुळे माती परीक्षण आपल्या गावात, शेतात, कुठेही व वेगाने करणे शक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट, वेळ, पैसा या वाचण्यास मदत होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माती परीक्षण करण्याचे प्रमाण वाढून, उत्पादन वाढीला चालना मिळू शकते. - अभय करंदीकर, संचालक, आयआयटी, कानपूर

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com