ट्रॅक्टरचलित बहुपीक टोकण यंत्र

टोकण यंत्राद्वारे पेरणी केल्यास रोपांची संख्या आणि अंतर योग्य राखता येते. टोकण पद्धतीने बियाणे लागवड करताना मजुरांच्या मदतीने एकसमान अंतरावर लहान छिद्रे पाडून त्यात बियाणे खोचले जाते.
ट्रॅक्टरचलित बहुपीक टोकण यंत्र
Tractor driven multi-crop planter

टोकण यंत्राद्वारे पेरणी केल्यास रोपांची संख्या आणि अंतर योग्य राखता येते. टोकण पद्धतीने बियाणे लागवड करताना मजुरांच्या मदतीने एकसमान अंतरावर लहान छिद्रे पाडून त्यात बियाणे खोचले जाते. शेतातून अधिक आणि शाश्‍वत उत्पादन मिळविण्यासाठी शेतीकामे योग्यवेळी करणे आवश्‍यक असते. हवामान बदल, पावसाचे असमान वितरण इत्यादी कारणांमुळे काही वेळा दुबार पेरणी करावी लागते. परिणामी, उत्पादन खर्चात वाढ होते. त्यासाठी श्रम आणि वेळेची बचत करणारी विकसित यंत्रे शेतीकामांमध्ये वापरणे सोयीचे ठरते. सुधारित यंत्राच्या वापरामुळे निविष्ठांचा योग्य प्रमाणात आणि आवश्‍यक तितकाच वापर करता येतो. बियाणे पेरणी योग्य अंतरावर केल्यामुळे खत आणि पाणी व्यवस्थापन करणे सोयीचे होते. हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखली जाते. त्यामुळे रोपांची दाटी होत नाही आणि पुरेसा सूर्यप्रकाश रोपांना मिळतो. तसेच विरळणी आणि पुनर्लागवड करण्याची गरज भासत नाही. शिवाय यंत्राद्वारे आंतरमशागत, खते देणे इत्यादी कामे जलद गतीने करता येतात. हस्तचलित टोकण यंत्र  शेतीमध्ये यांत्रिकीकरण येण्याआधी पेरणीसाठी बैलचलित पाभरीचा वापर केला जायचा. पाभरीच्या साह्याने पेरणी करताना दोन ओळींतील आणि रोपांतील अंतर समान राखणे शक्य होत नाही. त्यामुळे काही वेळा विरळणी आणि पुनर्लागवडीची कामे करावी लागतात.

 • टोकण यंत्राद्वारे पेरणी केल्यास रोपांची संख्या आणि अंतर योग्य राखता येते. टोकण पद्धतीने बियाणे लागवड करताना मजुरांच्या मदतीने एकसमान अंतरावर लहान छिद्रे पाडून त्यात बियाणे खोचले जाते.
 • बाजारामध्ये विविध प्रकारची हस्तचलित यंत्रे उपलब्ध आहेत. काही एक नळी, दोन नळी प्रकारची टोकण यंत्रे आहेत. तर काही यंत्रावर गोलाकार फिरत्या चाकावर बसविलेल्या पहारीच्या साह्याने खड्डे करून त्यात बिया टोकणारी यंत्रणा बसवलेली असते.
 • एक नळीच्या साह्याने बिया टोकण करणाऱ्या यंत्रामध्ये खालील बाजूस उघडझाप होणारी पहार जोडलेली असते. या पहारीची उघडझाप क्लचच्या साह्याने केली जाते. यामध्ये एकामागून एक असे बियाणांचे वितरण होते. परंतु अशा प्रकारच्या हस्तचलित टोकण यंत्राची प्रक्षेत्र क्षमता कमी असते. त्याऐवजी ट्रॅक्टरचलित टोकण यंत्राचा वापर जास्त केला जातो.
 • ट्रॅक्टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्र  आपल्याकडे शेतीकामांसाठी १२ ते २५ अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या ट्रॅक्टरच्या साह्याने ऊस तसेच फळबागांमध्ये आंतरमशागतीची तसेच पेरणीची कामे केली जातात. या कामांमध्ये सुसंगता येण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ‘फुले बहुपीक टोकण यंत्र’ विकसित केले आहे. वैशिष्ट्ये 

 • यंत्र १२ अश्‍वशक्ती आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे ओढता येते.
 • मजुरी, वेळ आणि श्रमाची बचत होते.
 • ज्वारी, सोयाबीन, हरभरा, मका, भुईमूग, सूर्यफूल, गहू इत्यादी पिकांची टोकण करण्यासाठी उपयुक्त.
 • बियांसोबतच दाणेदार खतांची पेरणी करता येते.
 • पारंपरिक पद्धतीमध्ये होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत ४० ते ५० टक्के बचत होते.
 • पारंपारिक पद्धतीपेक्षा वेळेमध्ये ५० ते ६० टक्के बचत होते.
 • - डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९ (डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.