पीक अवशेष व्यवस्थापनाकरिता अवजारे

मातीची सुपीकता आणि पिकांसाठी अन्नद्रव्ये सेंद्रिय अवशेष जाळल्यामुळे वाया जातात. याच पीक अवशेषाच्या व्यवस्थापनासाठी विकसित केलेल्या आधुनिक अवजारांची माहिती घेऊ.
पीक अवशेष व्यवस्थापनाकरिता अवजारे
पीक अवशेष व्यवस्थापनाकरिता अवजारे

पिकाच्या काढणीनंतर शिल्लक राहणारे अवशेष जाळण्यामुळे पर्यावरणाची समस्या निर्माण होत आहे. भारतामध्ये पंजाब, हरियानामधील पीक अवशेषांच्या जाळण्यामुळे दिल्लीसह अन्य भागांमध्ये धुरक्याची समस्या निर्माण होत आहे. यासाठी पिकांचे अवशेष जाळण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांवर बंधने आणण्याचा विचार सुरू आहे. यापेक्षाही सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे मातीची सुपीकता आणि पिकांसाठी अन्नद्रव्ये सेंद्रिय अवशेष जाळल्यामुळे वाया जातात. याच पीक अवशेषाच्या व्यवस्थापनासाठी विकसित केलेल्या आधुनिक अवजारांची माहिती घेऊ.

ट्रॅक्टरचलित पॉवर हॅरो

 •  ४५ व त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते. 
 •  पाती उभी असल्यामुळे जमीन दाबली जात नाही. जास्त खोलीवर पाती काम करतात.
 •  हलक्या, मध्यम, भारी व कठीण जमिनीसाठी उपयुक्त.
 •  हे प्राथमिक आणि दुय्यम मशागतीसाठी वापरले जाते.
 •  क्षेत्र क्षमता ३ ते ४ हेक्टर प्रति दिवस.
 • ट्रॅक्टरचलित मल्चर

 •  ४५ व त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते. 
 •  पीक कापणीनंतर शेतातील पीक अवशेष, पाला पाचोळा, काड्या, गवत, तण इ. चे बारीक तुकडे करते. उदा. उसाचे पाचट, भाताचा व गव्हाच्या काड्या इ.
 •  बारीक केलेल्या तुकड्याचे जमिनीत मिसळण्याचे कामसुद्धा या यंत्राद्वारे केले जाते. त्यामुळे शेतातच चांगले खत तयार होण्यास मदत मिळते.
 • पारंपारिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ७० टक्के बचत.
 • ट्रॅक्टरचलित श्रब मास्टर

 • ४० व त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते. 
 • गवत व झुडपे काढण्यासाठी उपयुक्त.
 • खडबडीत, कठीण झुडूप व उंच तणांची झाडे तोडण्यासाठी उपयुक्त.
 • ट्रॅक्टरचलित फुले कुट्टी यंत्र

 • ३५ व त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
 • फळबागेतील छाटणीनंतर पडणाऱ्या अवशेषांची कुट्टी करून बेडवर दोन्ही बाजूस समांतर टाकण्याकरिता उपयुक्त. उदा. द्राक्षे.
 • अवशेषांची कुट्टी करण्याकरिता ट्रॅक्टरच्या पीटीओ शक्तीचा वापर केला आहे, तर कुट्टी केलेले अवशेष बेडवर दोन्ही बाजूस समांतर टाकण्याकरिता हायड्रोलिक शक्तीचा वापर केलेला आहे.
 • प्रक्षेत्रीय क्षमता ७८ टक्के.
 • एका तासात ०.४७ हेक्टर क्षेत्रावर अवशेषांची कुट्टी करून टाकते.
 • पारंपारिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ७२ टक्के बचत.
 • ट्रॅक्टरचलित ॲग्रिकल्चरल वेस्ट श्रेडर 

 • २१ ते ४५ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
 • वाया जाणाऱ्या पीक अवशेषांचा (उदा. द्राक्ष, डाळिंब, पेरू, चिकू यांच्या छाटणीच्या काड्या व बागाचे खोड) चुरा करून हे बारीक केलेले पीक अवशेष बागेतच किंवा शेतात आच्छादन करता येते. ते कुजून मातीतील सेंद्रिय कर्ब वाढते. या अवशेषातील उपयुक्त अन्नघटक पुढील पिकासाठी पुनर्वापर होऊ शकतो.
 • क्षमता- १ टन प्रति तास  
 • ट्रॅक्टरचलित श्रेडर 

 • ४५ व त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते. 
 • एका तासात ६ ते ८ टन काडी कचऱ्याचे बारीक तुकडे करते. उदा. कापूस, तूर इ.
 • शेतातील पीक कापणीनंतर उरलेले पिकांच्या अवशेषाचे बारीक तुकडे करण्यासाठी उपयुक्त आहे.
 • यंत्राने बारीक केलेले तुकडे गांडूळखत निर्मितीसाठी वापरता येतात.
 • पारंपारिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ७० टक्के बचत.
 • ट्रॅक्टरचलित सुपर सीडर

 • ३५ व त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते. 
 • पाण्याची बचत आणि पर्यावरणपूरक. 
 • सेंद्रिय शेतीसाठी बारीक झालेले पिकांचे अवशेष उपयुक्त ठरतात.
 • क्षमता- ०.४५ हेक्टर प्रति तास
 • या यंत्राचा वापर करून गव्हाची कापणी केलेल्या शेतात भाताची थेट पेरणी करता येते.
 • ट्रॅक्टरचलित केळीचे खुंट बारीक करण्याचे यंत्र

 • ३५ व त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते. 
 • केळीच्या खुंटाचे बारीक तुकडे करण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो. बारीक केलेले केळीच्या खुंटाची कुट्टी गांडूळ खत निर्मितीसाठी वापरता येते.
 • क्षमता- १२० ते १३० केळीचे खुंट प्रति दिवस.
 • - डॉ. तुळशीदास बास्टेवाड,   ९४२३३४२९४१ (प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)    

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com