आफ्रिकन कृषी क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञान वापराचा होतोय अभ्यास
आफ्रिकन कृषी क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञान वापराचा होतोय अभ्यास

आफ्रिकन कृषी क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञान वापराचा होतोय अभ्यास

बेनिन, आयव्हरी कोस्ट आणि सेनेगल सारख्या आफ्रिकन देशांमध्ये कृषी संशोधन आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय केंद्र (CIRAD ) या फ्रेंच संस्थेद्वारे दी फ्रॅक्चर न्युमेरिक (डिजिटल डिव्हाईड) हा प्रकल्प चालवला जात आहे. या प्रकल्पाद्वारे कृषी क्षेत्रातील प्रामुख्याने तीन मूल्यवर्धन साखळीमधील विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी,माहितीच्या देवाणघेवाण व विश्लेषणासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांच्या दरवाजापर्यंत, शेताच्या बांधापर्यंत शाश्वत स्वरूपाचा विकास पोचवण्यात येणार आहे.

अलीकडे शेती व पूरक व्यवसायामध्ये सामाजिक माध्यम, डिजिटल अॅपचा वापर वेगाने वाढत आहे. मात्र आफ्रिकेतील अनेक विकसनशील देशांमध्ये मोबाईल व काही प्रमाणात इंटरनेटही पोचले असले तरी तुलनेने योग्य कारणासाठी वापर होताना दिसत नाही. बेनिन, आयव्हरी कोस्ट आणि सेनेगल सारख्या आफ्रिकन देशांमध्ये कृषी संशोधन आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय केंद्र (CIRAD ) या फ्रेंच संस्थेद्वारे दी फ्रॅक्चर न्युमेरिक (डिजिटल डिव्हाईड) हा प्रकल्प चालवला जात आहे. या प्रकल्पाद्वारे कृषी क्षेत्रातील प्रामुख्याने तीन मूल्यवर्धन साखळीमधील विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी,माहितीच्या देवाणघेवाण व विश्लेषणासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांच्या दरवाजापर्यंत, शेताच्या बांधापर्यंत शाश्वत स्वरूपाचा विकास पोचवण्यात येणार आहे. पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये कृषी क्षेत्रामध्ये विकास अंतिम टप्प्यापर्यंत पोचवण्यासााठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर उपयुक्त ठरू शकतो. अर्थात सामाजिक आणि आर्थिक असमानतेचा फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. तांत्रिक अडचणीसोबत इंटरनेटची रेंज सर्वत्र सम प्रमाणात नसण्याची समस्या महत्त्वाची ठरणार आहे. त्याविषयी माहिती देताना संस्थेचे कृषी तंत्रज्ञानविषयक तज्ज्ञ निकोलस पॅगेट यांनी सांगितले, की पश्चिम आफ्रिकेमध्ये डिजिटल तंत्रज्ञान व सेवा पोचवणे आणि वापरणे ही बाबच मुळी सातत्याने बदलती आहे. येथे शहरातील काही ठराविक भागांमध्ये बऱ्यापैकी फोर जी सेवा उपलब्ध असल्या तरी अद्याप त्या ग्रामीण भागामध्ये पोचलेल्या नाहीत. त्याच्या किमतीमुळे निर्माण होणारी असमानताही लक्षात घ्यावी लागते. विशेषतः अल्पभूधारक आणि कमी प्रमाणात पशुपालन करणारे शेतकरी व गट यापासून अद्यापही दूरच आहेत. डिजिटल तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या भेदाचे विश्लेषण नोव्हेंबर २०२१ मध्ये दी फ्रॅक्चर न्युमेरिक हा प्रकल्प सुरू झाला. त्याला फ्रेंचच्या युरोप व पराराष्ट्र विषयक मंत्रालय आणि डिजिट अॅग या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून अर्थसाह्य मिळाले आहे. त्यात प्रामुख्याने बेनिन येथील मार्केट गार्डनिंग, आयव्हरी कोस्ट येथील कोकोआ आणि सेनेगल येथील दूध संकलन या तीन मूल्यवर्धन साखळीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष क्षेत्रावरील सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यातून डिजिटल तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या भेदाची जाणीव झाली. त्याचे विश्लेषण करण्यात येत आहे. कारण मूल्यसाखळीच्या प्रत्येक टप्प्यावर इंटरनेट उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष नोंदविल्यानंतर डिजिटल साधने व सेवा विकसित करणाऱ्या आणि पुरवणाऱ्यांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता मांडण्यात आली. १) बेनिन येथील मार्केट गार्डनिंग येथे कोटोनोऊ आणि पाराकाऊ या शहरामध्ये मार्केट गार्डनर्स ताजी उत्पादन पोचवतात. ही पुरवठा साखळी अस्ताव्यस्त आणि अकेंद्रीभूत स्वरूपाची आहे. केटोऊ येथील राष्ट्रीय कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने पागेट यांनी काही अभ्यास केले. त्यातून अनेक बाबी उघड झाल्या. अ) आपल्या व्यवसायासाठी विशिष्ट अशा डिजिटल साधनांचा वापर होत नाही. ब) त्यातील अनेकजण वेगवेगळ्या सामाजिक माध्यमांचा वापर करतात. क) त्यातील काहीजण आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी जाहिरात करण्यासाठी या माध्यमाचा वापर करतात. वास्तविक उत्पादकांना बाजारपेठेविषयी जाणून घेणे, समन्वय ठेवणे आणि नेटवर्किंग यासाठी डिजिटल तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकते. २) आयव्हरी कोस्ट येथील कोकोआ कोकोआची मूल्यवर्धन साखळी ही मुख्यतः उभ्या पद्धतीची आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात हजारो उत्पादक असून, केवळ मोजकेच खरेदीदार असल्याचे कृषी विद्या तज्ज्ञ मार्टिन नोटॅरो यांनी सांगितले. त्यांनी यामौस्सोयक्रो येथील इन्स्टिट्यूट पॉलिटेक्निक हौफाऊयट बोईगनी यांच्या सहकार्याने अभ्यास केला. संशोधकाच्या गटाने देशाच्या पूर्व, मध्य आणि पश्चिम भागातील कोकोआ उत्पादकांच्या डिजिटल तंत्रज्ञान वापराचा अभ्यास केला. मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या खरेदीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करतात का? आणि लहान पण नगदी पिके घेणारे शेतकरी डिजिटल तंत्रज्ञानाचा काही फायदा करू घेतात का? या दोन प्रश्नाच्या अनुषंगाने पाहणी केली. ३) सेनेगल येथील साहेल प्रांतातील दूध मूल्यवर्धन साखळी सेनेगलच्या उत्तरेकडील फर्लो येथील सिल्वोपास्टोरल भागातील दूध उद्योगाची स्थिती मात्र सर्वांपेक्षा वेगळी आहे. त्याविषयी माहिती देताना जीन डॅनिअल सिसॅरो यांनी सांगितले, की लॅटेरिई डू बेर्गर डेअरीशी जोडलेल्या शेतकऱ्यांमध्ये दूध संकलन, पैसे देणे घेणे आणि पशुखाद्याची विक्री या घटकांच्या व्यवस्थापनासाठी काही डिजिटल साधनांचा वापर चांगलाच रुजत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com