पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी अवजारे

स द्यःस्थितीत ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. ट्रॅक्टरचलित यंत्रामुळे एक दिवस म्हणजेच आठ तासांत सुमारे ६ ते ७ एकरांपर्यंतची पेरणी शक्य होते. राहुरी येथीलमहात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये पेरणीसाठीसुधारित अवजारे विकसित केली आहेत.त्यांची माहिती घेऊ.
पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी अवजारे
पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी अवजारे

मनुष्यचलित भात बी पेरणी यंत्र

 • या यंत्राद्वारे भात बियांची पेरणी करता येते. 
 • हे यंत्र वजनाला हलके असून, एका मनुष्याच्या साह्याने सहज हाताळता येते.
 • या यंत्राची कार्यक्षमता २.३३ हेक्टर प्रति दिवस इतकी आहे.
 • लावलेल्या भातापेक्षा ७ ते १० दिवस आधी पीक पक्व होते.
 • मजुरीचा खर्च कमी येतो.
 • ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी टोकण यंत्र

 • ४० व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
 • या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू, हरभरा, तूर इ. पिकांची पेरणी पद्धतीने पेरणी करता येते.  
 • दाणेदार खतांची मात्रा बियाण्याच्या बाजूला देता येते. 
 • या यंत्राच्या साह्याने २.८ कि.मी. प्रति तास वेगाने ०.४६ क्षेत्रावर एका तासात सरी वरंबा तयार करून बियाचे टोकण करता येते.
 • गरजेनुसार कमी जास्त खोलीवर बियाची टोकण करता येते.
 • सरी वरंबाचा आकार आवश्यकतेनुसार बदलता येतो. तसेच आवश्यकतेनुसार दोन सरीतील व रोपातील अंतर बदलता येते.
 • ट्रॅक्टरचलित अर्धस्वयंचलित  रोप लागवड यंत्र

 • ४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
 • टोमॅटो, मिरची, वांगी व कोबी इ. पिकाची रोपे लागवडीसाठी उपयुक्त.
 • या यंत्रामुळे एका दिवसात ०.१५ ते ०.२ हेक्टर प्रति तास दराने रोपे लागवड करता येते.
 • पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत या यंत्रामुळे जास्त उत्पादन येते, व्यवस्थापन खर्च कमी येतो, पीक एक समानता वाढते आणि वाढीसाठी अनुकूल स्थिती प्राप्त होते.
 • स्वयंचलित भात रोपे लावणी यंत्र 

 • ३.९४  अश्‍वशक्तीने चालविता येते.
 • दोन ओळींतील अंतर २३.८ सें.मी. 
 • एका दिवसात ०.५ एकर प्रति तास रोपाची लावणी करता येते.
 • या यंत्रामुळे सिंगल सिलेंडर, हवेवर थंड होणारे डिझेल इंजिनच्या साह्याने पुढीच्या चाकाला शक्ती दिली जाते
 • या पद्धतीने पुनर्रोपणासाठी रोपवाटिकेत चटई प्रकाराने तयार केलेली रोपे वापरावी लागतात. 
 • ८ ओळींमध्ये एकाच पासमध्ये सलग टेकड्या मधील अंतर १२० ते १७० मि.मि. राहते  
 • ट्रॅक्टरचलित हवेच्या दाबावर कार्यान्वित यंत्र

 • ४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
 • हवेच्या दाबावर कार्य करत असल्यामुळे बियाण्यांची बचत होते.
 • या यंत्राद्वारे भुईमुग, सोयाबीन, कपाशी, तूर, मका इ. पिकांची पेरणी पद्धतीने पेरणी करता येते.  
 • एका दिवसात ३.५० ते ४ हेक्टर क्षेत्रावर टोकण करता येते.
 • पेरणीच्या अचूकतेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.
 • पेरणीची खोली एक समान असल्यामुळे चांगले उत्पादन येते.
 • पेरणीच्या प्रक्रियेदरम्यान कोणतेही नुकसान होत नाही.   
 • ट्रॅक्टरचलित अर्धस्वयंचलित बहुउद्देशीय प्लॅन्टर

 • ४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
 •  या यंत्राने सरी पाडून हळद, बटाटे व लसूण लावले जाते.
 • या यंत्रामुळे एका दिवसात १.५ ते २ हेक्टर क्षेत्र हळद लागवड करता येते.
 • ट्रॅक्टरचलित रोटो प्लॅन्टर

 •  ४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने  चालविता येते.
 • या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू, हरभरा, तूर इ. पिकांची पेरणी पद्धतीने पेरणी करता येते.  
 • एका दिवसात ३.५० ते ४ हेक्टर क्षेत्रावर टोकण करता येते.
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com