पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी यंत्रे

सद्यःस्थितीत ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. ट्रॅक्टरचलित यंत्रामुळे एक दिवस म्हणजेच आठ तासांत सुमारे ६ ते ७ एकरांपर्यंतची पेरणी शक्य होते. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये पेरणीसाठी सुधारित अवजारे विकसित केली आहेत. त्यांची माहिती घेऊ
पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी यंत्रे
पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी यंत्रे

मनुष्यचलित भात रोपे पुनर्लागवड यंत्र

  • २ ओळींतील आणि दोन रोपांतील योग्य अंतर राखता येते.  
  • या यंत्राची कार्यक्षमता ०.४५ हेक्टर प्रति तास इतकी आहे.
  • ट्रॅक्टरचलित मल्चिंग यंत्र

  •  ३५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते. योग्य अंतरावर छिद्रे पाडता येतात.
  • प्लॅस्टिक कागद व ठिबक पाइप तसेच खते जमिनीवर पसरविण्यास मदत करते.
  • गादी वाफे तयार करणे व आकार देणे.
  • या यंत्राचा वापर बेड तयार करणे, ठिबक पाइप टाकणे, मल्चिंग फिल्म अंथरणे व त्यावर छिद्रे पाडणे यासाठी होतो.
  • या यंत्रामुळे मजुरीचा खर्च, कामाच्या वेळेत बचत होते. 
  • ट्रॅक्टरचलित (सेमी ॲटोमॅटिक) हळद बेणे लावणी यंत्र

  • ४० व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
  • या यंत्राने सरी पाडून हळद बेणे लावले जाते.
  •  या यंत्रामुळे एका दिवसात १.५ ते २ हेक्टर क्षेत्र हळद लागवड करता येते.
  • ट्रॅक्टरचलित कांदा बी पेरणी यंत्र

  • ४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
  • या यंत्राने कांदा बीयांची पेरणी केली जाते.
  • या यंत्रामुळे एका दिवसात १.५ ते २ हेक्टर क्षेत्र कांदा पेरणी करता येते.
  • ट्रॅक्टरचलित ऊस लागवड यंत्र

  • ४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
  • या यंत्रामुळे एका दिवसात १.५ ते २ हेक्टर क्षेत्र ऊस लागवड करता येते.
  • या यंत्राने सपाट जमिनीमध्ये दोन रीजरच्या साह्याने सऱ्या पाडणे, अखंड उसाचे तुकडे करून बेणे सरीत पाडणे, बेण्यावर माती पसरणे, दाणेदार खते पेरून देणे, रोलरच्या मदतीने माती दाबणे इ. कामे एकाच वेळी केली जातात.
  • ट्रॅक्टरचलित (सेमी ऑटोमॅटिक) बटाटा लागवड यंत्र

  •  ३५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या चालविता येते.
  •  मनुष्यचलित लागवडीपेक्षा एक समान वाढ व परिपक्वता सुनिश्‍चित होत असल्याने उत्पादनात वाढ मिळते. 
  •  बटाट्याची लागवड कार्यक्षम, जलद व कमी खर्चात शक्य होते. 
  • ट्रॅक्टरचलित फुले ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र

  •  ४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
  •  या यंत्रामुळे एका दिवसात २.७५ ते ३ हेक्टर क्षेत्र ऊस रोपांची पुनर्लागवड करता येते.
  •  यंत्राच्या रोप ते रोप व ओळी ते ओळी अंतर अनुक्रमे ६०० मि.मी. आणि १५०० मि.मी. राहते.
  •  पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत या यंत्रामुळे खर्चामध्ये मोठी बचत होते.
  • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.