नवे अन्न गोठवण तंत्र वाचवेल प्रचंड ऊर्जा

गोठवलेल्या खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी आयसोकोरिक फ्रिजिंग या नव्या अन्न गोठवण प्रक्रियेकडे वळण्याची आवश्यकता अमेरिकन कृषी विभाग आणि कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून पुढे आली आहे.
नवे अन्न गोठवण तंत्र वाचवेल प्रचंड ऊर्जा
नवे अन्न गोठवण तंत्र वाचवेल प्रचंड ऊर्जा

गोठवलेल्या खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी आयसोकोरिक फ्रिजिंग या नव्या अन्न गोठवण प्रक्रियेकडे वळण्याची आवश्यकता अमेरिकन कृषी विभाग आणि कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून पुढे आली आहे. यामुळे ऊर्जेमध्ये मोठी बचत होणार असून कर्बवायू उत्सर्जनही कमी राहण्यात मदत होईल. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘रिन्युएबल अॅण्ड सस्टेनेबल एनर्जी रिव्ह्यूज’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. जर जागतिक पातळीवर गोठवण प्रक्रियेमध्ये योग्य ते बदल करणे शक्य झाले तरी ऊर्जेतील बचत प्रति वर्ष ६.५ अब्ज किलोवॉट -तास इतकी असू शकेल. त्याच प्रमाणे कर्बवायूचे उत्सर्जन (जे या ऊर्जेच्या निर्मिती प्रक्रियेतून होते) ते ४.६ अब्ज किलो इतके कमी होईल. हे प्रमाण रस्त्यावरून धावणाऱ्या सुमारे १० लाख कार इतके असेल. अशी माहिती अमेरिकन कृषी संशोधन सेवेच्या अन्न तंत्रज्ञ क्रिस्टिना बिलबायो -सैन्झ यांनी दिली. असे होतील नव्या तंत्राचे फायदे

 • या नव्या तंत्राच्या स्वीकारासाठी अन्न उत्पादन आणि गोठवण प्रक्रियेसाठीच्या उपकरणे आणि पायाभूत सुविधांमध्ये फारच थोडे बदल करावे लागणार आहेत. फक्त प्रक्रिया उद्योजकांनी नव्या तंत्र आणि पद्धतींचा स्वीकार करण्याची आवश्यकता आहे.
 • आयसोकोरिक फ्रिजिंग ही नवीन गोठवण पद्धत असून, त्याचा वापर पदार्थ सील असताना किंवा प्लॅस्टिक, धातू किंवा अन्य कोणत्याही भांड्यामध्ये असताना (अगदी त्यात पाण्यासारखा द्रव असतानाही) वापरता येते.
 •  पारंपरिक गोठवण प्रक्रियेमध्ये अन्नपदार्थ हे हवेमध्ये ठेवले जाते आणि घनपदार्थांची गोठवण ३२ अंश फॅरनहाइटपेक्षा तापमानावर केली जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नव्या तंत्रज्ञानामध्ये अन्नपदार्थांचे रूपांतर बर्फात करण्याची आवश्यकता राहत नाही.
 • त्याच प्रमाणे जोपर्यंत द्रवामध्ये खाद्यपदार्थ ठेवलेला असतो, तोपर्यंत त्यामध्ये बर्फाचे स्फटिक तयार होत नाहीत. बहुतांश अन्न गोठवणीमध्ये हा धोका असतो.
 • त्याच प्रमाणे या प्रक्रियेमध्ये पदार्थांची गोठवण संपूर्ण घनपदार्थ होईपर्यंत केली जात नाही. त्यामुळे नव्या प्रक्रियेमुळे ऊर्जेमध्ये मोठी बचत साधते.
 • आयसोकोरिक फ्रिजिंग हे ताज्या पदार्थाच्या साठवणीसाठीही चांगले उपयुक्त ठरते. उदा. टोमॅटो, स्वीट चेरीज आणि बटाटे इ. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांचा प्रदूषण नष्ट होते.
 • शेतकऱ्यांपासून अन्न प्रक्रिया उद्योगांपर्यंत आणि पुढे वितरण प्रणालीतील सर्व घटक या आयसोकोरिक फ्रिजिंग तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. ही पद्धती घरातील फ्रिजरमध्ये चांगल्या प्रकारे राबवता येऊ शकते. हे सर्व कोणताही अतिरिक्त खर्च न करता साध्य होऊ शकते. - तारा मॅकह्यूज, संचालक, डब्ल्यूआरआरसी केंद्र.

  संशोधन आणि पेटंट आयसोकोरिक फ्रिजिंग तंत्रज्ञानाचा विकास पहिल्यांदा कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठातील जैववैद्यकीय अभियंते बोरीस रूबिन्स्की यांनी पुनर्रोपणासाठी स्नायू आणि अवयव चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी केला. मात्र अन्न प्रक्रियेमध्ये या तंत्राचा वापर करण्यासाठी कृषी संशोधन सेवा आणि विद्यापीठ प्रयत्न करत असून, त्याचे संयुक्त पेटंट घेण्यात येणार आहे. यातून गोठवण अन्न उद्योगासाठी वेगवेगळी उपयोजना विकसित करणे शक्य होणार आहे. व्यावसायिक क्षेत्रात प्रसार करण्यासाठी ते व्यावसायिक भागीदाराचाही शोध घेत आहेत.  

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com