बटाटा साठवणीत हवा खेळती ठेवणारी प्रणाली

बटाटा साठवणीसाठी त्यात सातत्याने हवा खेळती राहणे गरजेचे असते. यासाठी बटाटा साठवणीमध्ये हवा खेळती ठेवणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
बटाटा साठवणीत हवा खेळती ठेवणारी प्रणाली
बटाटा साठवणीत हवा खेळती ठेवणारी प्रणाली

दक्षिण कर्नाटकमध्ये सामान्यतः सरासरी तापमान कमाल ३२ अंश आणि किमान १५ अंश सेल्सिअस असून, सापेक्ष आर्द्रता कमाल ८९ टक्के आणि किमान ४२ टक्के इतकी असते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ८९३ मिमी आहे. अशा स्थितीमध्ये बटाटे कुजणे, त्यावर बुरशीची वाढ होणे अशा कारणांमध्ये बटाट्याचे मोठे नुकसान होते. बटाटा साठवणीसाठी त्यात सातत्याने हवा खेळती राहणे गरजेचे असते. यासाठी बटाटा साठवणीमध्ये हवा खेळती ठेवणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे पारंपरिक पद्धतीच्या दोन ते तीन महिन्यांच्या साठवणीतील नुकसानीचे प्रमाण - भौतिक नुकसान २.१ टक्के आणि कुजण्यामुळे होणारे नुकसान २.८ टक्क्यानी कमी करण्यात यश आले आहे. ...असे आहे तंत्रज्ञान ही सोपी यंत्रणा असून, त्यामध्ये गोलाकार आडव्या सच्छिद्र पाइप आणि त्याला उभ्या वरपर्यंत जोडलेल्या पाइप (रायझर) यांचा समावेश होतो. मुख्य पाइपचा व्यास हा १०० मिमी असून, १३ मिमी व्यासाचा सच्छिद्र आडवा बसवलेला असतो. पाइपची लांबी शक्यतो बटाट्याच्या ढिगाइतकी असावी. दोन छिद्रांमधील अंतर ५० मिमी ठेवावे. दर एक मीटर अंतरावर एक रायझर उभा बसवावा. त्याचा व्यास ६० मिमी आणि शेवटची टोके मुख्य पाइपशी जोडलेली असतात. या पाइपना हलका उतार (२ अंश) दिलेला असतो. यामुळे हवेतील आर्द्रता व त्यामुळे तयार झालेला ओलावा उताराच्या दिशेने बाहेर काढणे शक्य होते. या रचनेमुळे ढिगाच्या आतील बाजूला तयार झालेली उष्ण हवा हलकी होऊन बाहेर फेकली जाते. थंड हवा आत येत राहते. ढिगामध्ये हवा खेळती राहिल्यामुळे बटाटे कंदाचे नुकसान होत नाही. आकार आणि क्षमता ः एकूण आकारमान - ३५ × १७ × ३ सेंमी वजन - ०.३५ किलो क्षमता - ७५० फळे प्रति तास. ( स्रोत - अखिल भारतीय समन्वित काढणीपश्‍चात तंत्रज्ञान संशोधन प्रकल्प, कृषी शास्त्र विद्यापीठ, बंगलोर, कर्नाटक)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com