जमिनीतील ओलावादर्शक उपकरण

जमिनीतील ओलावा दर्शविणारे उपकरण भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोइमतूर येथील ऊस पैदास संस्थेने विकसित केले आहे.
जमिनीतील ओलावादर्शक उपकरण
जमिनीतील ओलावादर्शक उपकरण

शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचे स्रोत कमी होत आहेत, ही चिंतेची बाब आहे. शेतीमध्येही ऊस, केळी, कापूस यांसारखी नगदी पिके उपलब्ध पाण्यापैकी मोठा हिस्सा खेचून घेतात. या सर्व पिकांमध्ये पिकांच्या आवश्यकतेपेक्षी कमी किंवा अधिक पाणी दिल्यास उत्पादकतेवर परिणाम होतो. त्याच प्रमाणे कमी ओलावा असताना पिकाला मातीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्येही घेण्यात अडचणी येतात. तसेच अतिपाण्यामुळे क्षारांचे प्रमाण वाढून जमिनीची सुपीकताही धोक्यात येते. आपल्या शेतजमिनीमध्ये ओलावा किती आहे, याचीच अनेक शेतकऱ्यांना माहिती नसते. त्याविषयी सारे अंदाज बांधले जातात. म्हणूनच पिकाला नेमके पाणी किती द्यायचे, कधी द्यायचे याविषयी शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करत असतात. मातीतील ओलावा जाणून घेण्यासाठी कोइमतूर येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या ऊस पैदास संस्थेमध्ये ओलावा दर्शक पकरण विकसित केले आहे. हे वापरण्यास सोपे असून, किंमतही कमी आहे. २०१६ मध्ये संस्थेचे संचालक डॉ. राम बक्षी यांच्या हस्ते या उपकरणाचे उद्‌घाटन करण्यात आले. या संशोधनासाठी भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभाग मंत्रालयाचा प्रथम पुरस्कारही मिळाला आहे. जमिनीतील ओलावा दर्शविणारे उपकरण भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोइमतूर येथील ऊस पैदास संस्थेने विकसित केले असून, त्याच्या उत्पादन व विक्रीचा परवाना टेक सोर्स सोलूशन या बंगळूर येथील या कंपनीने घेतला आहे. या उपकरणाची किंमत १४०० रुपये एवढी आहे जमिनीतील ओलावा दर्शक उपकरणाची रचना : ओलावा दर्शक उपकरणामध्ये संवेदक कांड्या (sensor rod) व आवरण (casing) यांचा समावेश आहे. यामध्ये दोन संवेदक कांड्या दिलेल्या असून, त्या दोन्हींमधील अंतर ३ सें.मी आहे. या उपकरणात १० दिवे, इलेक्ट्रॉनिक्स परिपथ, बॅटरीची तरतूद केली आहे. हे उपकरण चालू बंद करण्यासाठी बटण दिले आहे. असा करता येतो वापर ः जमिनीतील ओलावा मोजण्यासाठी, जमिनीतील ओलावादर्शक उपकरण्याच्या संवेदक कांड्या (sensor rod) आवश्यक तेवढा जमिनीत घुसवावा. (साधारण ३० सेंमी). त्यानंतर बटण चालू करावे. हे काही क्षण बटण दाबून धरल्यानंतर जमिनीतील ओलाव्यानुसार उपकरणात दिलेला दिवा चमकतो. पेटलेल्या दिव्याच्या रंगानुसार ओलाव्याची स्थिती समजते. उपकरणावर एक तक्ता दिलेला आहे. त्यानुसार पेटलेल्या दिव्याचा रंगानुसार आपल्याला ओलाव्याची स्थिती समजू शकते. उदा. जर उपकरण्याच्या संवेदक कांड्या जमिनीत घुसाविल्यानंतर निळा रंग आला तर जमिनीत खूप ओलावा असल्याचे समजावे. म्हणजेच पिकाला पाणी देण्याची गरज नाही. तक्ता १ : जमिनीतील ओलाव्याच्या स्थितीतील वाचन

अ.क्र पेटलेल्या दिव्याचा रंग ओलाव्याची स्थिती अनुमान
निळा खूप ओलावा पाणी देण्याची आवश्यकता नाही
हिरवा पुरेसा ओला वा लगेच पाणी देण्याची आवश्यकता नाही
नारंगी कमी ओलावा पाणी द्यावे
लाल खूप कमी ओलावा त्वरित पाणी द्यावे

जमिनीतील ओलावा दर्शक उपकरणाचे फायदे : १. जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण लगेच समजते, त्यानुसार पाण्याचे नियोजन करता येते. २. शेतीसाठी आणि कुंडीतील झाडासाठी फायदेशीर. ३. वेगवेगळ्या जमिनीत उपयुक्त. ४. वापरण्यास सोपे आणि किंमत कमी. संपर्क : अशोक भोईर (कार्यक्रम सहायक-मृदा विज्ञान), ९६३७७२६२५२७ डॉ. विलास जाधव (प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ), ८५५२८८२७१२ (गोएसो कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. पालघर)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com