
नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील रतन आनंदराव निकम या अभ्यासू शेतकऱ्याने आपल्या २२ एकर निर्यातक्षम बागेसाठी संपूर्ण स्वयंचलित ठिबक (ड्रीप ॲटोमेशन) केले आहे. या तंत्राचा वापर केल्याने मजुरी, वेळ, श्रम यात बचत झालीच, शिवाय उत्पादनाचा दर्जाही एकसमान मिळण्यास मदत झाली आहे. ना शिक जिल्हा निर्यातक्षम द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध आहे. याच जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील रतन आनंदराव निकम या वय वर्षे ३२ असलेल्या युवा शेतकऱ्याची यशकथा प्रेरणादायी म्हणावी लागेल. बीकॉम, एमबीएपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. रतन यांच्या अनुषंगाने बोलायचे तर उच्चशिक्षित तरुण जेव्हा जाणीवपूर्वक शेती हे करिअर निवडतो, तेव्हा तो वेगळं काही करण्याचा ध्यास घेतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. त्यातून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो.
रतन यांची प्रयोगशील शेती चांदवड तालुक्यात येणाऱ्या वडनेर भैरव, शिंदवड या गावांच्या शिवेजवळ रतन यांची २२ एकर शेती आहे. संपूर्ण २२ एकरांत द्राक्ष हेच पीक असून त्यात १८ एकर सोनाका तर चार एकर थॉमसन वाण आहे. एकीकडे निर्यातक्षम गुणवत्तेचा ध्यास आणि दुसरीकडे पाणी टंचाईचा अडथळा ही कसरत त्यांना प्रत्येक हंगामात करावी लागली आहे. सर्व समस्यांवर मात करण्यासाठीच रतन शंभर टक्के ड्रीप ॲटोमेशनकडे वळले.
ड्रीप ॲटोमेशन व पाणी व्यवस्थापन
शेततळे व पंपांसाठी प्लॅस्टिक ड्रम २०१६ मध्ये २०० फूट रुंद, २०० फूट लांब तर ३२ फूट खोल शेततळे घेतले आहे. त्याची क्षमता एक कोटी लिटरची आहे. त्यात दोन मोटार पंप टाकून ते पाणी फर्टिगेशन प्लॅंटपर्यंत नेता येते. पंप पाण्याच्या तळाशी न टाकता ते पाण्यात वरच्या तरंगते राहून गरजेपुरतेच पाण्यात बुडतील यासाठी प्लॅस्टिक ड्रमचा वापर केला आहे. त्यामुळे मातीच्या तळाशी पंपाचा संपर्क येत नाही. तसेच ‘हेडलॉस’ कमी होतो. पंपाची क्षमता वाढते.
फर्टिगेशन प्लॅंटची रचना
कार्यपद्धती
गुणवत्तेत वाढ रतन युके मार्केटसाठी एकरी १३ ते १४ टन उत्पादन तर बांगलादेश निर्यातीसाठी १५ ते १६ टन उत्पादन घेतात. सोनाका बांगलादेशात तर थॉमसन युके मार्केटला निर्यात होते. एका भारतीय निर्यातदार कंपनीसोबत त्यांनी करार केला आहे. त्यामुळे परदेशात मागणीनुसार द्राक्षे देण्यासाठी आवश्यक व एकसमान गुणवत्ता मिळावी यादृष्टीने अनेक कारणांमध्ये ॲटोमेशन तंत्राचाही वाटा राहिला आहे. ॲटोमेशन तंत्रासाठी एकूण ३२ लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. संपूर्ण ॲटोमेशन पद्धतीचे झाले फायदे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.